Subhash Shirodkar Dainik Gomantak
गोवा

Subhash Shirodkar: सहकारातून स्वावलंबी व्हा; सहकारमंत्री सुभाष शिरोडकर

Subhash Shirodkar: मंत्री शिरोडकर: पणजीत राष्ट्रीय सहकार सप्ताह कार्यक्रम

दैनिक गोमन्तक

Subhash Shirodkar: सहकार क्षेत्र हे देशातील महत्त्वाचे व चळवळीचे मोठे शस्त्र आहे. त्याचा वापर फक्त कर्ज मिळवण्यापुरते किंवा भागधारक होण्यापुरते सीमित न राहता या क्षेत्रात प्रत्येक कुटुंबात समृद्धी यावी आणि त्यातून त्यांनी स्वावलंबी व्हावे. या सहकार चळवळीतून अनेकांच्या आधार मिळतो. या क्षेत्राचा आवाका मोठा असल्यानेच सप्ताहभर त्याचे कार्यक्रम होतात, असे मत सहकारमंत्री सुभाष शिरोडकर यांनी व्यक्त केले.

70 व्या राष्ट्रीय सहकार सप्ताह गोवा राज्य सहकार संघ, भारतीय राष्‍ट्रीय सहकार संघ तसेच गोवा पीडब्ल्यूडी कर्मचारी सहकारी क्रेडिट संस्थेच्या संयुक्त विद्यमाने आज आल्तिनो - पणजी येथील पीडब्ल्यूडीच्या सभागृहात आयोजित करण्यात आला होता. या सप्ताहाच्या कार्यक्रमात प्रमुख पाहुण म्हणून मंत्री सुभाष शिरोडकर बोलत होते.

व्यासपीठावर पीडब्ल्यूडी मंत्री नीलेश काब्राल, मुख्य अभियंता संतोष म्हापणे, दामोदर महाविद्यालयाचे उपप्राचार्य संजय सावंत देसाई, सहकारी संघाचे अध्यक्ष रामचंद्र मुळे व निबंधक अभिजीत शेणवी उपस्थित होते. यावेळी मंत्र्यांचे हस्ते पीडब्ल्यूडी कर्मचारी क्रेडिट संस्थेसाठी बहुमोल कामगिरी केलेल्या धर्मेंद्र शिरोडकर, उमेश भंडारी, दीपक कुडणेकर, पुंडलिक शिरोडकर, सपना केरकर, दिपा तारी व साळू भगत यांचा शाल, श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.

सार्वजिनिक बांधकाम खात्याचे मंत्री निलेश काब्राल म्हणाले, मजूर कर्मचारी संस्थेच्या कर्मचाऱ्यांना सामावून घेतल्यास संस्थेला आणखी बळकटी येईल. सहकार खात्याने वेळोवेळी संस्थांच्या हिताच्या दृष्टीने कायद्यात दुरुस्ती केली आहे. त्यामुळे त्याचे फायदे मिळत आहेत.

‘त्या’ कर्मचाऱ्यांना लाभ द्या : मंत्री शिरोडकर म्हणाले, सहकार क्षेत्र अधिक बळकट होण्यासाठी अधिकाधिक सदस्यांचा समावेश करणे आवश्‍यक आहे. पीडब्ल्यूडी कर्मचारी क्रेडीट संस्थेमध्ये पीडब्ल्यूडी मजूर कर्मचारी संस्थेच्या कर्मचाऱ्यांनाही सामावून घ्यावे, अशी विनंती केली. ते सुद्धा या खात्याचे हंगामी कर्मचारी आहेत व त्यांनाही त्याचा लाभ द्या. संस्थेकडून घेतलेल्या कर्जाचा विनियोग योग्य पद्धतीने व्हायला हवा.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ashadhi Ekadashi: गोमंतकीयांना उत्तम आरोग्‍य, सुख, समृद्धी लाभो! आरोग्‍यमंत्र्यांचे श्री विठूरायाला साकडे

Goa Fraud: मोबाईल लिंकवर पैसे पाठवले, नंबर झाला 'नॉट रिचेबल'; क्रिप्टोतून जादा परताव्याच्या आमिषाने 3.35 लाखांचा गंडा

Sal Electricity Problem: अख्खी रात्र काळोखात! गोव्यातील 'या' गावामध्ये 15 तास वीज गायब; नागरिक हैराण

Porvorim Road: जुना रस्ता सुस्थितीत, नव्या रस्त्याची चाळण! पर्वरीतील सावळागोंधळ, पावसाने खड्ड्यांचे साम्राज्य

Mega Project Goa: गोव्यात येणार 800 कोटींचा मेगा प्रोजेक्ट! पाण्याची कमी तरी बड्या प्रकल्पांना पायघड्या; अजून 2 गृहप्रकल्प होणार

SCROLL FOR NEXT