GI Tag For Goa's Mankurad Mango, Bebinka Dainik Gomantak
गोवा

GI Tag For Mankurad, Bebinka: गोव्याच्या मानकुराद आंब्यासह 'बेबिंका'ला मिळाला जीआय टॅग

Akshay Nirmale

GI Tag For Mankurad Mango and Bebinka: गोव्यातील सुप्रसिद्ध मानकुराद आंबा आणि गोव्यातील मिठाईंची राणी म्हणून ओळखल्या जात असलेल्या बेबिंका या अस्सल गोवन मिठाईला आता जीआय टॅग अर्थात भौगौलिक मानांकन जाहीर झाले आहे. चेन्नईतील जीओग्राफिकल इंडिकेशन्स रजिस्ट्रीतर्फे हे मानांकन जाहीर करण्यात आले आहे.

गोव्यातून ऑल गोवा मँगो ग्रोअर्स असोसिएशन, पणजी यांनी मानकुराद आंब्याला जीआय टॅग मिळावा, यासाठी अर्ज केला होता. आंब्याच्या या जातीला मलकोराद, कार्डोझो मानकुराड, कोराडो आणि गोवा मानकुर असेही म्हणतात.

पोर्तुगीजांनी या फळाला मालकोराद असे नाव दिले होते. त्याचा अर्थ होतो ज्याचा रंग खराब आहे असा. कालांतराने कोकणी भाषेत त्याचे मानकुराद आमो (आंबा) असे नाव बनले.

यापुर्वी गोव्याच्या काजूला जीआय टॅग देण्याची घोषणा गोवा सरकारने केली होती. याशिवाय आगामी काळात सात शिऱ्यांची भेंडी, आगाशी येथील वांगी या उत्पादनांनाही जीआय टॅग मिळू शकतो.

जीओग्राफिकल इंडिकेशन (GI) रजिस्ट्रीच्या जर्नलमध्ये ही नावे प्रकाशित झाली आहेत. जीआय टॅग मिळविण्याच्या प्रक्रियेतील हा अंतिम टप्पा मानला जातो. आहे.

जर्नलमध्ये प्रकाशनाच्या तारखेपासून 90 दिवसांत या उत्पादनांना अधिकृतपणे GI दर्जा प्राप्त होईल. 91 व्या दिवसापासून ही उत्पादने नोंदणीकृत मानली जातील आणि GI प्रमाणपत्र जारी केले जाते.

दरम्यान, मानांकनाच्या या यादीत गोव्याच्या या दोन पदार्थांसह भारतातील एकूण सात उत्पादनांचा समावेश आहे. त्यात राजस्थानातील चार उत्पादने आहेत तर एक उत्पादन उत्तर प्रदेशातील आहे.

यात राजस्थानच्या जलेसर धातू शिल्प (एक धातूची हस्तकला), उदयपूर कोफ्टगरी मेटल क्राफ्ट, बिकानेर काशीदकारी क्राफ्ट, जोधपूर बंधेज क्राफ्ट, आणि बिकानेर उस्ता कला क्राफ्ट या उत्पादनांचा समावेश आहे.

सजावटीची धातूची कलाकुसर, शस्त्रास्त्रांचे अलंकार, आरशाचे काम, बांधणी आणि रंगरंगोटीसह सुरेख टाके आणि सोनेरी रंगाचे उंटाच्या चामड्याचे काम यांची ही उत्पादने आहेत.

जीआय मानांकन म्हणजे काय?

विशिष्ट भागात एखादे उत्पादन घेतले जात असेल आणि त्या उत्पादनाला काही विशिष्ट ओळख असेल तर त्याला जीआय मानांकन दिले जाते. जीआय म्हणजे जीओग्राफिकल इंडिकेशन. म्हणजे विशिष्ट भौगोलिक ओळख. हा टॅग मिळालेली गोष्ट अथवा उत्पादन संबंधित ठिकाणची मूळ गोष्ट किंवा उत्पादन असल्याचे मानले जाते.

जीआय मानांकन हे उत्पादन आणि प्रदेशाशी निगडित आहे. वेगवेगळ्या भौगोलिक परिस्थितीमुळे विविध ठिकाणी उत्पादित होणारे एकच उत्पादन वेगवेगळ्या गुणवत्तेचे असू शकते. त्यामुळे गुणवत्तेची ओळख कायम ठेवण्यासाठी हे मानांकन महत्त्वाचे ठरते.

जीआय टॅगचे महत्त्व

एखाद्या उत्पादनाला जीआय मानांकन मिळाल्यास त्याचे उगमस्थान निश्चित होते. त्याचा फायदा उत्पादकांना मिळतो. कारण त्या उत्पादनाचे नाव इतर कुणी वापरू शकत नाही. उत्पादकांना संबंधित उत्पादनाची गुणवत्ता कायम ठेवण्यासाठीही त्याचा लाभ होतो.

जीआय मानांकनामुळे उत्पादकाला अनेक लाभ मिळतात. संबंधित उत्पादनाचे नाव इतरांना वापरता येत ना ही तसेच या उत्पादनाची बनावट निर्मिती आणि विक्रीस आळा बसू शकतो.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Saint Francis Xavier: सुभाष वेलिंगकरांच्या अटकेसाठी उद्रेक; पर्यटक, विद्यार्थ्यांचे हाल, गोव्यात दिवसभर कुठे काय घडलं?

Goa HSE Board Exam: गोवा बारावी बोर्ड परीक्षेच्या वेळापत्रकात बदल, JEE परीक्षेमुळे मोठा निर्णय

Goa Today's News Live: बेपत्ता सुभाष वेलिंगकरांचा अटकपूर्व जामीन अर्ज!

Fact Check: गोव्यात बोट पलटी होऊन 23 लोकांचा मृत्यू, 64 बेपत्ता; व्हायरल व्हिडिओ मागील सत्य काय?

Tourist in Goa: गोव्यात धार्मिक तणाव, पर्यटकांची पायपीट तर शाळकरी मुलांचे हाल!!

SCROLL FOR NEXT