G20 Summit In Goa Dainik Gomantak
गोवा

Goa G20 Summit 2023: राज्यात लावणार 50,000 रोपे... पण संरक्षणाचे काय?

मोपा ते दाबोळी मार्गासह, शहरातही महत्वाच्या मार्गांवर रस्त्याकडेला रोपांची लागवड

Akshay Nirmale

Goa G20 Summit 2023: गोव्यात G20 च्या आठ बैठका होणार आहेत. त्यातील पहिल्या बैठकीला आता केवळ एका आठवड्याचा कालावधी उरला आहे. तत्पुर्वी या बैठकींच्या पार्श्वभुमीवर राज्यात विविध प्रकारची झाडांची रोपटी लावून राज्याचे सौंदर्य वाढवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या अंतगर्त सुमारे 50,000 रोपे लावण्यात येणार आहेत.

दरम्यान, ही 50,000 रोपे लावण्याची तयारी केलेली असली तरी ती जगवणार कशी आणि त्यांचे संरक्षण कसे करणार, याची उत्तर मात्र अनुत्तरीत आहेत. एकतर सध्या राज्यात कडक उन्हाळा सुरू आहे. गेल्या काही दिवसांपासून तर वातावरण प्रचंड दमट झाले आहे.

त्यामुळे ही झाडे जगविण्याचे आव्हान असणार आहे. शिवाय या रोपट्यांची चोरी होण्याची शक्यता आहे.

गोव्यातील मोपा आणि दाबोळी अशा दोन्ही विमानतळांवर G20 चे प्रतिनिधी आणि मंत्र्यांचे शिष्टमंडळ भेट देणार आहे. त्यामुळे मोपा येथील मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळपासून ते दाबोळी येथील गोवा आंतरराष्ट्रीय विमानतळापर्यंत रस्त्याच्या कडेला ही रोपे लावण्यात येत आहेत.

भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणला ( NHAI) मोपा आणि धारगळ ते गिरीपर्यंत वृक्षारोपण मोहीम हाती घेण्यास सांगितले गेले आहे, तर वनविभाग 25 किमी अंतरावर रोपे लावणार आहे.

राजधानी पणजीत महापालिकेला फुलांची झुडपे लावण्यास सांगण्यात आले आहे तर GSIDC (गोवा राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळ) ने अटल सेतू अंतर्गत हिरवळ आणि फुलांची झुडपे लावण्याचा निर्णय घेतला आहे.

दोन रोपट्यांमध्ये 1 मीटर अंतर सोडून ही रोपे लावली जात आहेत. जनावरांना चरण्यास योग्य नसलेली ही फुलांची रोपटी आहेत. रस्त्यांमधील आयलंड, चौकांमध्ये, कुंपणाच्या कडेला ही शोभेची झाडे लावली जात आहेत.

ओल्ड गोवा ते मेरशी मार्ग, वेर्णा जंक्शन ते दाबोळी विमानतळ आणि चिखली तसेच कदंबा बस स्टँड ते मेरशी जंक्शन या मार्गावरही रोपटी लावली जात आहेत. याशिवाय वनविभागाकडून जून-जुलैमध्ये वृक्षारोपण मोहिम हाती घेतली जाते.

तथापि, काही रोपांनी अद्याप मुळे धरलेली नाहीत तर काही ठिकाणी ही रोपे उपटून काढल्याचे दिसत आहे. त्यामुळे या रोपट्यांचे संरक्षण हा महत्वाचा मुद्दा असणार आहे. ही रोपे पुण्यातील वनविभागाच्या रोपवाटिकेतून आणण्यात आली आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mark Zuckerberg News: चाइल्ड पोर्नोग्राफी आणि डीपफेक कंटेंटवरुन मोदी सरकार आक्रमक, मार्क जुकरबर्गने मागितली माफी; मेटाच्या अधिकाऱ्यांना पुन्हा समन्स

India vs Sri Lanka: स्वातंत्र्यदिनी टीम इंडिया रचणार इतिहास! अशी कामगिरी करणारा भारत ठरणार जगातील तिसराच; श्रीलंकेत गिल ब्रिगेड करणार कमाल

Navpancham Rajyog 2026: सूर्य-शनिच्या नवपंचम राजयोगानं उजळणार 5 राशींचं भाग्य; धनलाभासह करिअरमध्ये मिळणार प्रचंड यश!

CJP Paper Leak Protest: पेपरफुटीच्या वादात युवाशक्तीचा मोठा विजय! प्रधानांचा राजीनामा अन् मोदी सरकारचा नतमस्तक होणारा पराजय?

Gold Silver Rate: सोन्याचा भाव गगनाला भिडला! 1 लाख 46 हजारांचा टप्पा केला पार, चांदीनेही गाठला नवा उच्चांक; जाणून घ्या आजची किंमत

SCROLL FOR NEXT