Woman injured in bear attack at Surla Dainik Gomantak
गोवा

Surla Sattari: सुर्ला, सत्तरी येथे शाळेत निघालेल्या 17 वर्षीय विद्यार्थिनीवर अस्वलाचा हल्ला

विद्यार्थिनीच्या हात-पायावर जखम झाली असून उपचारासाठी तिला रुग्णालयात हलविण्यात आले.

Pramod Yadav

Surla Sattari: सुर्ला, सत्तरी येथे शाळेत निघालेल्या 17 वर्षीय विद्यार्थिनीवर अस्वलाने हल्ला केल्याची घटना उघडकीस आली आहे. विद्यार्थिनी तिची आजी आणि बहिणीसोबत जात असताना बुधवारी (दि.04) सकाळी ही घटना घडली. विद्यार्थिनीच्या हात-पायावर जखम झाली असून उपचारासाठी तिला रुग्णालयात हलविण्यात आले.

भाग्यश्री देऊ पिंगळे (वय 17, रा. सुर्ला) असे अस्वलाच्या हल्यात जखमी झालेल्या विद्यार्थिनीचे नाव आहे.

सुर्ला - सत्तरी भागात अस्वलांचा वावर ही तेथील स्थानिकांसाठी चिंतेचा विषय ठरत चालला आहे. भाग्यश्री बुधवारी सकाळी शाळेत जात असताना तिच्यासोबत तिची आणि बहीण देखील होती. भाग्यश्री पुढे चालत असताना झुडपात दबा धरुन बसलेल्या अस्वलाने तिच्यावर हल्ला केला.

अस्वलाने हल्ला करताच भाग्यश्री व आजी आणि बहीण यांनी आरडाओरडा केला. आरडाओरडा केल्यानंतर वनखात्याच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर अस्वलाने पळ काढला व भाग्यश्री बचावली.

या हल्यात भाग्यश्री जखमी झाली असून, तिच्यावर सुर्ला प्राथमिक रुग्णालयात उपचार केल्यानंतर केरी येथे हलविण्यात आले. सध्या ती सुखरुप असल्याची माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली आहे.

अस्वलाने तिच्या पिल्लांच्या संरक्षणासाठी विद्यार्थिनीवर हल्ला केल्याचे सांगितले जात आहे. मोठा आवाज करताच अस्वल दोन्ही पिल्लांना घेऊन जंगात पळाली.

दरम्यान, या भागात अस्वलाचा वावर वाढला असून, स्थानिकांना भीतीच्या छायेखाली जगावे लागत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics: "आम्हाला कोणी बोलावलंच नाही",फातोर्डा मेळाव्यावर पालेकरांचा खुलासा; 'आप'शिवाय विरोधी पक्षांची एकजूट?

Sancoale Theft: गोव्यात आणखी एक मोठी चोरी, सांकवाळ येथे फ्लॅट फोडला; 8.5 लाखांचे दागिने, महागडी घडयाळे लंपास

Goa Live Updates: सांकवाळ येथे फ्लॅटमध्ये चोरी; 8 लाखांचा ऐवज लंपास

Majorda: धिरयोत उधळला रेडा, छातीत खुपसले शिंग; माजोर्डा मृत्यूप्रकरणातील संशयित अमेरिकेत, पोलिसांच्या वाढल्या अडचणी

Corlim Accident: ऐन दिवाळीत कोसळला दुःखाचा डोंगर! भरधाव गाडीने दिली पादचाऱ्याला धडक; 39 वर्षीय व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू

SCROLL FOR NEXT