Goa Beach Wedding Dainik Gomantak
गोवा

Beach Wedding In Goa : किनाऱ्यावरील विवाह सोहळे, कार्यक्रम महागले; अधिसूचना जारी

विविध श्रेणींच्या छाननी शुल्कात लक्षणीय वाढ; पर्यटन व्यावसायिकांना फटका

दैनिक गोमन्तक डिजिटल

गोवा हे ‘वेडिंग डेस्टिनेशन’ आहे. फेसाळत्या लाटांच्या सान्निध्यात निसर्गाच्या साक्षीने विवाह साकारणे हा आज-काल प्रतिष्ठेचा विषय बनला आहे. अनेकजण अशाप्रकारे विवाह करण्यासाठी गोव्यात येतात. मात्र, यंदापासून किनारी भागातील या सोहळ्यांसाठीचे शुल्क वाढवण्यात आले आहे. त्याचा फटका पर्यटन व्यावसायिकांसह सामान्यांनाही बसू शकतो.

गोवा किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरणाने किनारी भागातील विविध संरचनेच्या छाननी शुल्कात लक्षणीय वाढ केली आहे. त्याला पर्यावरण विभागानेही मंजुरी देत अधिसूचित केले आहे. त्यामुळे किनारी भागातील साधनसुविधा निर्मितीसह कार्यक्रमही महागले आहेत.

किनारी भागातील सुधारित शुल्क असे...

  1. तात्पुरती संरचनेचा उभारणीसाठी परवानगी. (उदा. झोपडी/तंबू) : शॅकसाठी १ हजार प्रति चौ.मी. आणि झोपडी/कॉटेज/तंबूसाठी ५०० रु. प्रति चौ.मी. (७ वर्षांसाठी नवी परवानगी).

  2. बीच वेडिंग / कार्यक्रम / सेटअपसाठी परवानगी : १ लाख रुपये प्रतिदिन (शाळा/संस्थेसाठी ७५ टक्के सवलत आणि सरकारी विभाग/चॅरिटेबल ट्रस्टसाठी ५० टक्के सवलत)

  3. हॉटेल/रिसॉर्टच्या नवीन बांधकामासाठी परवानगी : १ हजार रुपये प्रति चौ. मी. (अंगभूत क्षेत्र)

  4. नवीन बंधाऱ्याची भिंत/रिटेनिंग वॉल/कम्पाउंड वॉल/संरक्षक भिंतीसाठी परवानगी : २५ हजार रुपये सामान्य, तर ५० हजार रुपये व्यावसायिक वापर म्हणजे हॉटेल/रिसॉर्ट/बीच रिसॉर्ट/हॉटेल व्हिला यांसाठी.

  5. बैठकीत निर्णय : राज्य पर्यावरण विभागाने ‘जीसीझेडएमए’च्या प्रस्तावित शुल्कवाढीला मंजुरी देत ती अधिसूचित केली आहे. किनाऱ्यांवर तात्पुरती संरचना, विवाह सोहळे, इतर कार्यक्रम, हॉटेल्सचे बांधकाम यासारख्या श्रेणी शुल्कात भरीव वाढ केली आहे. रिसॉर्ट व इतर सुधारित शुल्काचा प्रस्ताव ९ मार्च रोजी ‘जीसीझेडएमए’च्या बैठकीत घेतला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics: दिल्लीतून पैसे घेतल्याची एक तरी सेटिंग सिद्ध करून दाखवा, RGP पक्षच बंद करू; तुकारामांचे 'मायकल'ना ओपन चॅलेंज

मडगाव रेल्वे स्टेशनवर दोन भीषण अपघात! धावत्या ट्रेनमध्ये चढताना एकाचा मृत्यू; Watch Video

Viral Video: पठ्ठ्यानं ट्रेनलाच बांधली स्टीलची पेटी, सोशल मीडियावर जुगाडाचा व्हिडिओ व्हायरल; नेटकरी म्हणाले, 'अशा लोकांमुळेच बिहार बदनाम होतोय'

Ind vs Aus 2nd ODI: सचिन-विराटलाही जमला नाही 'तो' कारनामा केला, चौकार मारुन रचला इतिहास; कांगारुंच्या भूमीवर हिटमॅनचा रेकॉर्डब्रेक फॉर्म VIDEO

Yagneshwar Nigalye Passed Away: विनोदी, मिश्किल आणि कोटीबाज वाणी, दाभोळकरांच्या 'अंनिस'चा गोव्यात पाया रचणारे यज्ञेश्‍वर निगळ्ये वयाच्या 90 व्या वर्षी काळाच्या पडद्याआड!

SCROLL FOR NEXT