Heat Wave  Dainik Gomantak
गोवा

Heat Wave In Goa: काळजी घ्या! राज्यात आज उष्णतेच्या लाटेचा इशारा

38.4 अंश सेल्सियस : राज्यात आज उष्णतेच्या लाटेचा इशारा

गोमन्तक डिजिटल टीम

सामान्य तापमानापेक्षा 6 अंश सेल्सियस अधिकच्या तापमानाची नोंद होत पणजीतला पारा आज 38.4 अंश सेल्सियसवर पोहोचला. हे गेल्या 50 वर्षांतील तिसरे सर्वाधिक तापमान आहे. हवामान खात्याच्या गोवा वेधशाळेने राज्यात उद्या, 9 मार्च रोजी उष्णतेच्या लाटेची घोषणा केली असून लोकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन केले आहे. खासकरून ज्येष्ठ नागरिक आणि आजारी व्यक्तींनी स्वत:ची काळजी घ्यावी.

आज (बुधवारी) राज्यात मार्चमधील सर्वाधिक 38.4 अंश तापमानाची नोंद करण्यात आली, जी सामान्य कमाल तापमानाच्या तुलनेत 6अंशांनी अधिक आहे. मार्च 1979 मध्ये तापमानाचा पारा 39 अंशांवर गेला होता. यापूर्वी 3 मार्च 2013 मध्ये 38.7 अंश सेल्सियस तापमान होते.

दुसऱ्यांदा उष्णतेची लाट

यंदा राज्यात अशा प्रकारे कमाल तापमानात वाढ होण्याची घटना दुसऱ्यांदा घडत आहे; परंतु त्यावेळी उष्णतेची लाट घोषित करण्याइतपत स्थिती निर्माण झाली नव्हती. मात्र, एप्रिल २०२२ मध्ये राज्यात पहिल्यांदा उष्णतेच्या लाटेची घोषणा करण्यात आली होती. राज्यातील तापमान व हवामानात सातत्याने बदल घडत असल्याने लोकांनी सतर्क राहण्याची आवश्‍यकता आहे.

उष्णतेच्या लाटेची कारणे

राज्यात पूर्वेकडून येणाऱ्या वाऱ्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. सद्यस्थितीत आकाश निरभ्र, कोरडे आहे. किनारी भागात समुद्रावरून येणारे वारे कमी झाले असल्याने राज्यातील तापमानात वाढ होत आहे.

गेले कित्येक दिवस कमाल तापमान सामान्य तापमानाहून अधिक आहे. गुरुवारी, शुक्रवारी राज्यातील कमाल तापमान 4 ते 6 अंश सेल्सियसने अधिक असणार असल्याने उष्णतेच्या लाटेची घोषणा केली आहे.

उष्णतेची लाट जाहीर करण्याचे भौगोलिकदृष्ट्या निकष वेगवेगळे असतात. गोवा हे राज्य समुद्र किनाऱ्याकाठी वसलेले आहे. अशा ठिकाणी ज्यावेळी कमाल तापमान दोन दिवस 37 अंशांवर जाते, तसेच ज्यावेळी तापमान सर्वसामान्य तापमानाच्या तुलनेत 4.5अंशांनी अधिक असते, अशावेळी उष्णतेची लाट जाहीर करण्यात येते.

ही घ्या काळजी

राज्यातील कमाल तापमान १० मार्चपर्यंत वाढणार असल्याने नागरिकांनी योग्य काळजी घेणे गरजेचे आहे.

निरभ्र आकाशाखाली काम करणाऱ्या व्यक्तींनी काही काळ मध्ये मध्ये विश्रांती घेण्याची आवश्‍यकता आहे.

शरीरात पाण्याची कमतरता भासू देऊ नये.

राज्य आपत्ती व्यवस्थापनाद्वारे देण्यात येणाऱ्या सूचनांचे पालन करावे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Virat Kohli: क्रिकेट विश्वात खळबळ! 'हा माझा शेवटचा वनडे वर्ल्ड कप', भारत-वेस्टइंडिज मालिकेपूर्वी किंग कोहलीनं फोडला मोठा बॉम्ब

Goa Agriculture: पिकलेल्या भातशेतीसमोर मोठे संकट, हार्वेस्टिंग मशीनची प्रतीक्षा; मांद्रे-कोरगाव हद्दीतील पीक वाया जाण्‍याची भीती

Asian Games 2026: गोल्डन गर्लज्! रोमहर्षक लढतीत भारताच्या पोरींनी मारली बाजी; इराणची धूळधाण करत पटकावलं 'सुवर्णपदक' VIDEO

Stray Cattle: होंडा-वाळपई मार्गावर भटक्या गुरांचा सुळसुळाट, रात्रीच्‍या वेळी रस्त्यावर ठाण; अपघातांना आमंत्रण, दुचाकीस्‍वारांना धोका

Patto Bridge Security: पाटो पुलावरील सुरक्षेच्या त्रुटींवर 'मानवाधिकार'ची तंबी; सीसीटीव्ही, पथदिवे आणि 24 तास पोलिस गस्तीचे निर्देश

SCROLL FOR NEXT