Goa Beach Dainik Gomantak
गोवा

Goa Beach: सेर्नाभाटीत बे-वॉच बनले बीच हाऊस

Goa Beach: पार्ट्यांचा धुरळा : कोलवा सिव्‍हीक फोरमकडून प्राधिकरणाकडे नव्‍याने तक्रार

दैनिक गोमन्तक

Goa Beach: सेर्नाभाटी येथील वाळूच्‍या टेकड्या कापून संरक्षक भिंत उभारल्यामुळे वादात सापडलेले बे-वाॅच बीच रिसॉर्ट या आस्‍थापनाने नावच बदलून ‘बीच हाऊस’ हे नवीन नाव धारण केले आहे. या हॉटेलच्‍या विरोधात किनारपट्टी व्‍यवस्‍थापन प्राधिकरणाकडे तक्रार प्रलंबित असली तरी या नवीन नामधारी हाॅटेलमध्ये पार्ट्यांचा जल्‍लोष मात्र अजूनही सुरूच आहे.

वाळूच्या टेकड्या उद्ध्वस्त केल्याप्रकरणी किनारपट्टी व्‍यवस्‍थापन प्राधिक़रणाकडे तक्रार दाखल केलेल्‍या कोलवा सिव्‍हीक ॲण्‍ड कन्‍झुमर फोरमच्‍या अध्‍यक्ष ज्‍युडिथ आल्‍मेदा यांनी प्राधिक़रणाच्‍या लक्षात ही बाब आणून दिली आहे.

या आस्‍थापनाला १० नोव्‍हेंबर २०२३ रोजी ‘काम बंद’चा आदेश दिला होता. तरीही २४ नोव्‍हेंबर रोजी या ठिकाणी एक मोठी लग्‍नाची पार्टी साजरी केली, असे नमूद करून या पार्टीचे फोटोही प्राधिकरणाला पाठविले आहेत.

बे-वॉच रिसॉर्टविरोधात यापूर्वीही सीआरझेड क्षेत्रात घुसखोरी करून बांधकाम उभारल्‍याच्‍या तक्रारी दाखल झाल्‍या हाेत्‍या. यापूर्वी या आस्‍थापनाला काही बांधकामे मोडून टाकण्‍याचा आदेश दिला होता.

अशी पार्श्‍वभूमी असलेल्‍या या आस्‍थापनाने नोव्‍हेंबर महिन्‍यात स्‍थानिक पंचायत आणि स्‍थानिक जैवविविधता समितीला अंधारात ठेवून सेर्नाभाटी किनाऱ्यावर दगडाची भिंत उभारण्‍याचे काम सुरू केले. त्‍याला कोलवा सिव्‍हीक फोरमने हरकत घेत किनारपट्टी प्राधिकरणाकडे तक्रार केल्‍यानंतर 10 नोव्‍हेंबर रोजी दक्षिण गोवा उपजिल्‍हाधिकाऱ्यांनी ‘काम बंद’चा आदेश दिला होता.

या आस्‍थापनाच्‍या विरोधात तक्रार दाखल झाल्‍यानंतर येथील सर्व व्‍यवहार बंद होण्‍याची गरज होती. असे असतानाही ही पार्टी कशी झाली, असा सवाल आल्‍मेदा यांनी केला आहे. या आस्‍थापनाने वाळूच्या टेकड्या कापून बेकायदेशीर रस्‍ताही तयार केला आहे, असा आराेप त्‍यांनी केला आहे. याप्रकरणी प्राधिकरणाने त्‍वरित कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

प्राधिकरणाचा सदस्‍य सचिव बदला : किनारपट्टी व्‍यवस्‍थापन प्राधिकरणाच्‍या सदस्‍य सचिव स्‍नेहा गीते यांच्याकडे पर्यावरण खात्‍याचे संचालक आणि उत्तर गोवा जिल्‍हाधिकारी अशी आणखी दोन पदे आहेत. त्‍यामुळे प्राधिकरणाच्‍या कामास त्‍या वेळ देऊ शकत नाहीत. यामुळे प्राधिकरणासमोर वर्ग केलेली कित्‍येक प्रकरणे रखडली आहेत. या कामाला गीते पुरेसा वेळ देऊ शकत नाहीत. त्‍यामुळे त्‍यांच्‍याकडील सदस्‍य सचिवाचा पदभार कमी करा, अशी मागणी करणारे पत्र आल्‍मेदा यांनी मुख्‍य सचिवांना पाठविले आहे.

अनेक दावे प्रलंबित

प्राधिकरणासमोर जे दावे आणि तक्रारी सादर केल्‍या जातात, त्‍यांच्‍या सुनावण्‍यांसाठी सदस्‍य सचिव हजर असणे कायद्याने बंधनकारक आहे. पण स्नेहा गीते यांच्‍याकडे उत्तर गोवा जिल्‍हाधिकारी हे आणखी एक महत्त्वाचे पद असल्‍याने त्‍या या सुनावण्‍या घेण्यास हजर राहू शकत नाहीत. त्‍यामुळे अनेक दावे पडून राहिले आहेत, याकडे आल्मेदा यांनी प्रशासनाचे लक्ष वेधले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT