Shigmo Festival 2023 In Goa
Shigmo Festival 2023 In Goa Dainik Gomantak
गोवा

Goa Shigmotasv 2023: दुर्भाटच्या चित्ररथाची बाजी

गोमन्तक डिजिटल टीम

Shigmo Festival 2023 In Goa: पेडणे शिमगोत्सव समिती व गोवा राज्य पर्यटन खाते यांच्या संयुक्त विद्यमाने येथे आयोजित अखिल गोवा चित्ररथ स्पर्धेत दुर्भाट-फोंडा येथील त्रिवेणी कला संघाने प्रथम पारितोषिक पटकावले.

रोमटामेळ स्पर्धेत खांडेपार शिमगोत्सव समितीला, लोकनृत्य स्पर्धेत कुर्टी-फोंडा येथील सरस्वती कला मंडळ केळबायला तर वेशभूषा स्पर्धेत अनुष्का मोरजकर (राज्‍यस्‍तरीय) व सुरेखा किनळेकर (पेडणे तालुका मर्यादित) हिने अव्‍वलस्‍थान मिळविले.

चित्ररथ स्‍पर्धेत दुसरे पारितोषिक श्री देव दाडेश्वर स्पोर्ट्स ॲण्‍ड कल्चरल क्लब नेरुल-बार्देश, तिसरे श्री महालक्ष्मी नागरिक समिती बांदोडा-फोंडा, चौथे लक्ष्मण रायकर प्रस्तुत जालंधराकडून शिवगणांचा छळ कुंभारजुवे, पाचवे बालगोपाळ कला आणि सांस्कृतिक मंडळ ओल्ड गोवा यांना मिळाले.

उत्तेजनार्थ बक्षिसे ब्रह्मेश्वर युवक संघ आखाडा, आडपई युवक संघ आडपई, श्री भगवती कला संघ ढवळी, मेरशी सांस्कृतिक ट्रस्ट मेरशी, माऊली स्पोर्ट्स व कल्चरल क्लब पेडणे, काळोबा राष्ट्रोळी युवक संघ पेडणे, श्री सातेरी युवक मंडळ मेरशी, साई रवळनाथ कवळे, ताळगाव यूथ, साई कला मंडळ घोगळ-मडगाव, श्री दामबाब प्रसन्न मडगाव यांना प्राप्‍त झाली.

चित्ररथ स्पर्धेसाठी संजय हरमलकर, पीए सूर्यवंशी, शिवप्रसाद किनळेकर यांनी परीक्षण केले. अखिल गोवा रोमटामेळ व लोकनृत्य स्‍पर्धेसाठी दिलीप धारगळकर, गोरख मांद्रेकर व भरत बागकर यांनी, 12 वर्षांखाली वेशभूषेसाठी प्रशांत मांद्रेकर, किरण बुगडे व गोविंद नाईक यांनी तर 12 वर्षांवरील स्पर्धेसाठी सोमनाथ पार्सेकर, सुधीर कुबडे व प्रमोद मांद्रेकर यांनी परीक्षण केले. सर्व विजेत्या संघांनी, स्पर्धकांनी पेडणे शिगमोत्सव समिती किंवा भाजप कार्यालयाशी संपर्क साधावा.

आडपई सुयोग मंडळ द्वितीय

रोमटामेळ स्पर्धेत द्वितीय बक्षीस सुयोग शिमगोत्सव मंडळ आडपई, तिसरे स्वरसाई शिमगोत्सव मंडळ म्हापसा, चौथे बार्देश समिती, पाचवे शिमगोत्सव मंडळ डोंगरी, सहावे श्री शांतादुर्गा समिती कळंगुट तर सातवे बक्षीस विद्यासंकुल हायस्कूल पेडणेला मिळाले.

अखिल गोवा लोकनृत्य स्पर्धेत सरस्वती कला मंडळ केळबाय कुर्टी, श्री सिद्धिविनायक कला संघ, श्री नवदुर्गा कला संस्कृती, विजय कला मंडळ, किडझी प्रायमरी हायस्कूल पेडणे यांना अनुक्रमे बक्षिसे मिळाली.

वेशभूषेत सुरेखा, अनुष्का प्रथम

पेडणे तालुका 12 वर्षांखालील वेशभूषा स्पर्धेत प्रथम सुरेखा किशोर किनळेकर, द्वितीय दक्ष मळीक, तृतीय श्रीयंश सुभाजी, उत्तेजनार्थ रिधीमा म्‍हावळणकर, तेज परब, रोहित निंबाळकर, चेतना कोरगावकर यांना पारितोषिके प्राप्‍त झाली.

अखिल गोवा पातळीवरील 12 वर्षांवरील वेशभूषा स्पर्धेत प्रथम अनुष्का मोरजकर, द्वितीय धनंजय नाईक, तृतीय आनंद हरमलकर तर उत्तेजनार्थ बक्षिसे मदन तारी, वेदिका तेली, नवनाथ हळर्णकर, प्रमोद मोर्लेकर व नंदिता शेट्ये यांना मिळाली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Kanguva: 'कंगुवा'चा टीझर घालतोय धूमाकूळ; गोव्यासह ‘या’ खास ठिकाणी झालं बीग बजेट चित्रपटाचं शूटिंग

Goa Congress: सार्दिन घरात बसून विरियातोंचा प्रचार करतात; पाटकरांनी टोचले MP फ्रान्सिस यांचे कान

Prajwal Revanna: आम्ही व्हिसा दिला नाही… प्रज्वल रेवन्ना जर्मनीला पळून गेल्याच्या प्रश्नावर परराष्ट्र मंत्रालयाची प्रतिक्रिया

Shashi Tharoor In Goa: भाजपला धक्का बसणार, 400 नव्हे 200 पार करने देखील जड जाणार - थरुर

Goa Police : २४ वर्षांपासून अजूनही ‘ते’ न्यायाच्या प्रतिक्षेत; बडतर्फ पोलिसाची व्यथा

SCROLL FOR NEXT