Goa Cashew Price
Goa Cashew Price Gomantak Digital Team
गोवा

Goa Cashew Price: काजूबियासंदर्भात सावंत सरकारकडून आधारभूत किमतीचे गाजरच!

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Cashew Price: सत्तरी तालुका काजू पिकांनी बहरलेला आहे. डोंगर, माळरानावर अनेक ठिकाणी काजूची झाडे आहेत. पण गेल्या काही वर्षांपासून काजूबियांना चांगला दर मिळत नाहीय. त्यामुळे बागायतदार हवालदिल बनले आहेत.

गेल्या काही वर्षांपासून त्‍यांना आधारभूत किमतीचे गाजर दाखविण्यात येत आहेत. पण प्रत्‍यक्षात हाती काहीच नाही. याबाबतची अधिसूचना कधी जाहीर होणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

सरकारने यावर्षीही काजूला दीडशे रुपये आधारभूत किंमत जाहीर केली होती. पण त्याच्‍या कार्यवाहीची अंमलबजावणी अजून तरी झालेली नाही.

त्यामुळे सत्तरी तालुक्यातील बागायतदार वर्ग विवंचनेत सापडला आहे. याबाबत सोनाळ-तार येथील रणजीत राणे म्हणाले की, सरकार प्रत्येक वेळी लोकांची फसवणूक करीत आले आहे.

दोन वर्षांपूर्वी 125 रुपये किंमत देणार असे सांगितले होते. त्यानुसार सत्तरीतून अनेकांनी कृषी खात्यात अर्जही सादर केले होते. पण आधारभूत किमतीचा अजूनही पत्ता नाही. आता यावर्षी दीडशे रुपयांचे गाजर दाखविण्यात आले आहेत.

लोकांनी केवळ सरकार दरबारी कागदपत्रे सादर करायची, हातात मात्र दमडीही मिळत नाही.

सरकारकडून मिळतात फक्त आश्‍‍वासने

सावर्डे येथील रघू गावकर यांनी सांगितले की, काजूबियांना चांगला दर मिळत नाही ही बागायतदारांची मोठी शोकांतिका होय. सरकारकडून फक्त आश्‍‍वासने दिली जातात. प्रत्यक्षात कार्यवाही काही नाही. आधारभूत किंमतच वेळेत मिळत नसल्याने हा कोणता आधार? असा सवाल आम्हाला पडतो. तर, मासोर्डेचे गौरीश गावस म्हणाले की, काजू पीक हे सत्तरीतील लोकांचे प्रमुख पीक आहे.

काजू आयात धोरण जोपर्यंत बंद होत नाही, तोपर्यंत गोव्यातील काजूबियांना चांगला दर मिळणे कठीण आहे. त्यातच सरकार लोकांना नवनवीन आश्वासने देत असते. आधारभूत किंमत देण्यासाठी अजूनपर्यंत सरकारने योग्य पावले उचललेली नाहीत. त्यामुळे सत्तरीतील बागायतदार उदासीन बनलेला आहे.

गेल्या काही वर्षांपासून काजूबियांना 100 ते 130 रुपये किलो असा दर आहे. वाढत्या महागाईच्या काळात हा दर परवडणारा नाही. सध्‍याच्या घडीला बागायतदारांनाच स्वत:चे पैसे या कामासाठी खर्च करावे लागताहेत.

सत्तरीतील काजू बिया चवदार असतात. या बियांना कमीत कमी 200 रुपये दर अपेक्षित आहे. मात्र दीडशे रुपयेसुद्धा दर मिळत नाही हे आमचे दुर्देव म्हणावे लागेल.

ॲड. भालचंद्र मयेकर, वाळपई

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa BJP: प्रतापसिंह राणे यांचा श्रीपादना पाठिंबा, मी संघाची विचारधारा स्वीकारली; विश्वजीत राणे

Goa Today's Top News : राणेंचा गौप्यस्फोट, लोकसभा, राजकारण, अपघात; राज्यातील ठळक बातम्या एका क्लिकवर

Workers March Goa: पोटावर लाथ मारणारे सरकार हवे कशाला? फार्मा कंपन्यांवरील एस्मा मागे घ्या; पणजीत कामगारांचा एल्गार

Zero Shadow Day: सावली गोमन्तकीयांची साथ सोडणार; राज्यात अनुभवता येणार झिरो शाडो

Goa News: गोव्यात वेश्याव्यवसायिक 12 महिलांना मिळाला मतदानाचा अधिकार

SCROLL FOR NEXT