Bardez Water Shortage  Dainik Gomantak
गोवा

Bardez Water Shortage : बार्देशवासीयांच्या पाचवीला पूजलेलेच पाण्याचे दुर्भिक्ष्य; टॅंकरवरच भिस्त

Bardez Water Shortage : प्रशासकीय पातळीवर तसेच पाणीपुरवठा विभागाच्या गलथान कारभारामुळे अत्यंत कमी दाबाने व कमी वेळी होणाऱ्या पाणीपुरवठ्यामुळे एकप्रकारे कृत्रिम पाणीटंचाई निर्माण झाली असून, नागरिकांना टँकरच्या पाण्यावर अवलंबून राहावे लागते.

गोमन्तक डिजिटल टीम

Bardez Water Shortage :

म्हापसा समाधानकारक पाणीसाठा असला तरी बार्देशात विशेषतः किनारी भागांत पाणीटंचाई नित्याचीच बनली आहे. जलशुद्धीकरण प्रकल्पांची कमी क्षमता तसेच पाण्याचा वाढलेला वापर ही पाणीटंचाईची प्रमुख कारणे आहेत.

प्रशासकीय पातळीवर तसेच पाणीपुरवठा विभागाच्या गलथान कारभारामुळे अत्यंत कमी दाबाने व कमी वेळी होणाऱ्या पाणीपुरवठ्यामुळे एकप्रकारे कृत्रिम पाणीटंचाई निर्माण झाली असून, नागरिकांना टँकरच्या पाण्यावर अवलंबून राहावे लागते.

दरम्यान, किनारी भागांतील हॉटेल, रेस्टॉरंट्स वाल्यांना कधीच पाण्याची कमतरता भासत नाही. परंतु, स्थानिक रहिवाशांना पाणीपुरवठा करतेवेळी प्रशासनाकडून थातूरमातूर उत्तरे देऊन संबंधितांची बोळवण केली जाते. त्याचप्रमाणे राजरोसपणे वाढत चाललेली अमर्याद बांधकामे, इमारतींची वाढती संख्या, फ्लॅट्स तसेच नवीन वसाहत प्रकल्पांमुळे पाण्याचे नियोजन कोलमडले आहे. यातून प्रशासकीय पातळीवर दूरदृष्टीचा अभाव प्रकर्षाने जाणवतो.

उन्हाळ्यात विशेषतः मे उजाडल्यावर आर्द्रता वाढते, परिणामी पाण्याचा वापरही वाढतो. उकाड्यामुळे बागकामांपासून घरात दैनंदिनसाठी कामासाठी पाण्याची मागणी अधिक वाढते. मात्र, तालुक्याला पुरेसा पाणीपुरवठा होत नसल्याने तसेच वाढती काँक्रीटची जंगली या पाणीपुरवठ्याला मुख्य कारणीभूत असल्याचे सांगितले जाते.

बार्देशातील शिवोली, कळंगुट, पर्वरी या भागांत अधिकतर पाण्याची समस्या नित्याचीच आहे. अनियमित पाणीपुरवठा हा कळीचा मुद्दा आहे. या भागांतील शेवटच्या भागांपर्यंत सुरळीत व अपुरा पाणीपुरवठा होत नसल्याने येथील लोकांना मनस्ताप तसेच टँकरच्या पाण्याचा आधार घेतल्याशिवाय दुसरा पर्याय नाही.

विशेषतः आसगाव पंचायत क्षेत्रामधील बादे तसेच हणजूण-कायसूव पंचायत भागातील लोकांनी पिण्याच्या पाण्यासाठी शेकडो आंदोलने केली. परंतु, या समस्येवर कायमस्वरुपी तोडगा अद्याप प्रशासकीय पातळीवर काढता आलेला नाही. तत्कालिन विधानसभा निवडणुकीत शिवोली मतदारसंघात पाण्याचा प्रश्न हा सत्तापरिवर्तनासाठी महत्त्वाचा मुद्दा बनलेला.

यासंदर्भात स्थानिक आमदार दिलायला लोबो यांनी सांगितले की, शापोरा व बादे भागातील पिण्याच्या पाण्याची समस्या सोडविण्यासाठी सरकार कटिबद्ध असून काम सुरू आहे. आसगाव पंचायत क्षेत्रातील दोशोशीर येथे नवीन पिण्याच्या जलकुंभ उभारण्याचे काम सुरू आहे. तर सोनारखेड भागात नवीन जलशुद्धीकरण प्रकल्पाचे काम सुरू आहे. सदर काम डिसेंबरअखेर पूर्ण होईल. त्यानंतर शिवोलीतील पाण्याचा प्रश्न कामयचा सुटेल, अशी ग्वाही त्यांनी दिली.

आसगाव-बादे भागातील लोकांना पाणीटंचाईची झळ अधिकप्रमाणात बसली आहे. परिणामी येथील लोकांवर टँकर किंवा पाणी विकत आणण्याशिवाय पर्याय नाही. याविषयी सहाय्यक अभियंता (साबांखा) यांनी सांगितले की, आसगाव येथे नवीन ५.६ एमएलडी प्रकल्पाचे काम सुरू आहे. त्याशिवाय, जुनाट जलवाहिन्या बदल केले जाताहेत. हे काम पूर्णत्वास येताच, लोकांना आराम मिळेल.

३० एमएलडी प्रकल्पाचे काम सुरू

कळंगुट-कांदोळी किनारी भागातील रहिवाशांना भेडसावणाऱ्या पाणीटंचाईचे निराकरण करण्यासाठी सरकारकडून ३०एमएलडी स्वतंत्र रॉ वॉटर पंपिंग व ट्रीटमेंट प्रकल्पाचे काम सुरू आहे. पिळर्ण येथे टेकडीवर हा जलशुद्धीकरण प्रकल्प उभा राहतोय.

दुष्काळात तेरावा महिना...

शिवोली मतदारसंघात भूमिगत वीजवाहिन्या टाकण्याचे काम सुरू आहे. परंतु अनेकदा कंत्राटदाराच्या निष्काळजीपणामुळे जलवाहिन्यांना धक्का पोहचविला जातो. कालांतराने या जलवाहिन्यांना गळती लागते, परिणामी पाण्याच्या दाबवर परिणाम होतो.

या प्रकारामुळे साबांखाच्या अमियनित पाणीपुरवठ्यामुळे आधीच वैतागलेल्या स्थानिकांना दुष्काळात तेरावा महिना अशी मानसिक ताप सहन करावा लागतो. तसेच ही स्थिती बार्देशातील इतरत्र ठिकाणी पाहायला मिळते.

थेंबथेंब पाणी साठवण्याची धडपड

आसगाव, बादेमध्ये मोठे व्हिला व बांधकामे उभी राहताहेत. येथील लोकांना जेमतेम पाणी मिळते. येथील प्रत्येकाच्या घरी पाणी हाच चर्चेचा विषय असतो. थेंब न् थेंब साठवण्यासाठी नागरिकांचा प्रयत्न सुरू आहे, अशा बिकट परिस्थितीत बांधकामांचा सपाटा आहे. त्यासाठी मोठ्या प्रमाणात पाण्याचा वापर होतोय. मुख्यतः पाण्याचे नियोजन नसताना, अशाप्रकारे मोठे बंगले व व्हिलांना परवानगी का म्हणून दिली जाते? असा सवाल स्थानिक पातळीवर विचारताहेत.

टॅंकरवाल्यांची सुगी

शिवोली मतदारसंघाला ‘साबांखा’कडून एक समर्पित पिण्याच्या पाण्याचा टँकर ठेवला आहे. तसेच इतर तालुक्यातील मतदारसंघांना त्यांच्या गरजेनुसार टँकर उपलब्ध करून दिला जातो. जेव्हा-जेव्हा कुठे पिण्याची समस्या उद्भवते, तिथे पाण्याचा टँकर पोहच केला जातो. तरीही हे टँकर कुठे म्हणून पुरणार.अशावेळी स्थानिक खासगी टँकरवाल्यांना बोलावून आपल्या पिण्याची तहान भागवतात. सध्या शिवोली, आसगाव, हणजूणमध्ये खासगी टँकरवाल्यांना सुगीची दिवस आलेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT