Sirsaim By-Poll Election Result  Dainik Gomantak
गोवा

Sirsaim By-Poll Election Result: शिरसई पोटनिवडणुकीत प्रभाग क्रमांक 5 मधून तेजा कांदोळकर विजयाच्या मानकरी!

सकाळी 8 वाजल्यापासून बार्देश तालुक्याच्या अधिसूचित केंद्रात मतमोजणीला सुरुवात झाली.

Kavya Powar

Sirsaim By-Poll Election Result: बार्देश तालुक्यातील शिरसई ग्रामपंचायतच्या प्रभाग क्रमांक 5 च्या पोटनिवडणुकीचा आज सोमवार (29 जानेवारी) निकाल जाहीर झाला आहे. सकाळी 8 वाजल्यापासून बार्देश तालुक्याच्या अधिसूचित केंद्रात मतमोजणीला सुरुवात झाली. या प्रभागातून तेजा राजेश कांदोळकर सर्वाधिक मतांनी विजयी ठरल्या आहेत.

यावेळी विजयी उमेदवार तेजा कांदोळकर यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्या म्हणाल्या की, 'मला निवडून आणण्यासाठी मी सर्व मतदारांची, माझे कुटुंब आणि मित्रमंडळींची आभारी आहे. यापुढे प्रभागासाठी काम करताना मी प्रामुख्याने महिला सक्षमीकरणावर भर देणार आहे. पंचायतीतर्फे ज्या योजना राबवल्या जातात; त्या बहुदा अनेकांपर्यंत पोहोचत नाहीत, त्या योजना शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचण्यासाठी प्रयत्न करणार असून सामाजिक कार्यातही मी तत्पर राहणार आहे.'

काल रविवारी (28 जानेवारी) रोजी सरकारी शाळेत मतदान पार पडले. या निवडणुकीसाठी एकूण तीन उमेदवार रिंगणात होते. यामध्ये तेजा कांदोळकर यांना 123, रुपम कुडणेकर यांना 77 तर ग्रीष्मा कांबळी यांना 63 मते प्राप्त झाल्याचे मतदान अहवालातून स्पष्ट झाले. महिलांसाठी आरक्षित असलेल्या या प्रभागात एकूण 77.43 टक्के मतदान झाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Drug Case: ड्रग्स प्रकरणात गोव्याचा 'बाबा' आणि 'मुन्ना' चर्चेत; हैदराबादेत अटक केलेल्या तस्कराच्या चौकशीत आंतरराज्य नेटवर्कचा गौप्यस्फोट

Pakistan Airstrike Afghanistan: पाकड्यांचा अफगाणिस्तानवर पुन्हा एअरस्ट्राइक! कुनार अन् पक्तिका प्रांतावर केला बॉम्बवर्षाव; अनेक जण गंभीर जखमी

Goa Crime: मोखर्ड येथे एकाच घरात दोन बहिणींचे कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह; दुर्गंधी आल्यानंतर उघडकीस आला धक्कादायक प्रकार

RBI New FD Rules: 1 ऑक्टोबरपासून बदलणार एफडीचे नियम! सर्व बँकांसाठी आरबीआयचा 'मास्टरस्ट्रोक'; तुमच्या पैशांवर काय होणार परिणाम?

Pond Fish Death Goa: गणपती विसर्जनानंतर कपिलेश्वरी-कवळेच्या तळीत मासे मृत; 'बॉम्बसदृश' फटाक्यांमुळे प्रदूषण झाल्याचा स्थानिकांचा दावा

SCROLL FOR NEXT