Bardez water crisis Dainik Gomantak
गोवा

Bardez Water Crisis: 3 महिन्यांपासून पाण्याची समस्या! बार्देशवासीय संतप्त; म्हापसा येथे PWD अभियंत्याला घेराव

Bardez water protest: लोकांचा पाणी पुरवठा हॉटेल व्यावसायिकांना केला जात असल्याचा आरोप करण्यात आला. किमान पाणीपुरवठा न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा नागरिकांकडून देण्यात आला.

Sameer Panditrao

बार्देश: बार्देश तालुक्यातील अनेक मतदारसंघात सध्या भीषण पाण्याची टंचाई भासत आहे. त्यामुळे पाण्यासाठी हणजूण, शिवोली, शापोरातील नागरिकांनी म्हापशात सार्वजनिक बांधकाम खात्याच्या साहाय्यक अभियंत्याला आज घेराव घातला. लोकांचे पाणी हॉटेल व्यावसायिकांना पुरवण्यात येत असल्याचा आरोप आंदोलकांनी केला. त्यामुळे प्रशासनाने सुरळीत पाणीपुरवठा न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा यावेळी अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.

मागील ३ महिन्यांपासून पाण्याची समस्या निर्माण झाली असल्याची माहिती लोकांनी दिली. किमान गरज भागवण्यासाठी सुद्धा पाणीपुरवठा होत नसल्याचे अभियंत्याच्या निदर्शनाला आणून देण्यात आले आहे. लोकांचा पाणी पुरवठा हॉटेल व्यावसायिकांना केला जात असल्याचा आरोप करण्यात आला. किमान पाणीपुरवठा न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा नागरिकांकडून देण्यात आला.

नागरिकांनी व्हॉल्व बंद केला जात असल्याचा आरोप केला जातो. हा व्हॉल्व कोणाच्या सल्ल्यावरून बंद केला जात असल्याचेही निदर्शनाला आणून देण्यात आली. इतर लोकांना होत असलेला पुरवठा व्यवस्थित होत असतो. पूर्वी दिवसाआड पाणीपुरवठा होत होता, पण आता तोसुद्धा होत नसल्याचे पार्वती नागवेकर यांनी सांगितले. यावेळी नागरिकांनी साहाय्यक अभियंत्याला त्यांच्या सोबत येण्याची विनंती केली.

Taligao Water Crisis

गेल्या वर्षी नवीन लाईन बसवण्यात आली होती, पण त्यातूनही पुरवठा होत नाही. आमदारांनीही लक्ष देण्याची गरज आहे, असे आंदोलक म्हणाले, तसेच कर्मचारी वर्ग बदलण्याची मागणी करण्यात आली. नीलेश गोवेकर यांनी व्हॉल्व बंद केला जात असल्याचाही आरोप केला.

लोकप्रतिनिधींनी लक्ष द्यावे!

गेल्या काही महिन्यापासून जलपुरवठा व्यवस्थित होत नसल्यामुळे ग्रामस्थांतून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. अनेकवेळा विनंती करूनही पाणीपुरवठा सुरळीत केला जात नाही. किमान लोकप्रतिनिधींनी लक्ष घालून ही समस्या सोडवावी, अशी ग्रामस्थांची मागणी आहे.

यापूर्वी ‘घागर मोर्चा’

शिवोली परिसरातील पाण्याचा प्रश्न अजूनही सुटलेला नाही. पाण्यासाठीचा ग्रामस्थांचा संघर्ष चालूच आहे. यापूर्वी पाणी टंचाइचा विषय गाजला होता. परिसरातील ग्रामस्थांनी ‘घागर मार्चा’ काढून निषेध नोंदवला होता. यावर तोडगा काढण्यात येणार असल्याचे मंत्री, आमदारांनी सांगितले होते मात्र किनारी भागात मोठे हॉटेल्स, रिसोर्ट यांना मोठ्या प्रमाणात पाणी लागत असल्याने ग्रामस्थांना मात्र अडचणींचा सामना करावा लागतो, असा आरोप ग्रामस्थ करीत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

क्रिकेटमध्ये मोठा उलटफेर! सचिन तेंडुलकरचा 'अशक्य' वाटणारा विक्रम मोडला; बॅननंतर परतलेल्या टेलरनं रचला इतिहास

Horoscope: गणेशोत्सवात 'या' 4 राशींचे भाग्य उजळणार! गणपती बाप्पाच्या विशेष कृपेने बुद्धी, करिअर आणि पैशांच्या बाबतीत मिळणार प्रचंड लाभ

Asia Cup Trophies: 'ट्रॉफी चोरा'कडून भारताच्या विजेतेपदाची ट्रॉफी कधी मिळणार? BCCI नं स्पष्टच सांगितलं; आंतरराष्ट्रीय स्तरावर मोहसिन नक्वीची पुन्ही नाचक्की

Viral Post: 1.5 कोटींची नोकरी सोडली; आता महिन्याला फक्त 500 रूपये कमाई; तरीही तरुणी म्हणते, 'हा निर्णय चुकीचा नाही' VIDEO

Lashkar e Taiba Commander Killing: पाकड्यांच्या 'टेरर फॅक्टरी'ला मोठा हादरा! हाफिज सईदचा जवळचा दहशतवादी कराचीत ठार; अज्ञात हल्लेखोरांचा थरारक गोळीबार

SCROLL FOR NEXT