Goa Bardez Flood  Dainik Gomantak
गोवा

Goa Rain Update: बार्देशात पावसाचा तडाखा; तळेश्वर मंदिरात पाणी, गिरी पंचायतघर बंद

Bardez: गिरी, पर्रा, खोर्ली, कोलवाळ, आसगाव या ठिकाणी सात घरांवर झाडे कोसळली

गोमन्तक डिजिटल टीम

जुलै महिन्याच्या सुरुवातीपासून राज्यात पावसाची जोरदार बॅटिंग सुरु असून, सध्या नामोशी-गिरी येथे पूरसदृश स्थिती निर्माण झाली आहे. परिणामी, संततधार पडणाऱ्या पावसामुळे गिरी पंचायत घर मागील आठ दिवसांपासून बंद आहे.

गेले दोन दिवस मुसळधार पावसामुळे बार्देश तालुक्यातील जनजीवन पूर्णतः विस्कळीत झाले. पावसाच्या मारामुळे यावेळी तीन घरांच्या भिंती कोसळल्या. तर सात घरांवर झाडे कोसळली. कोलवाळ येथे तळेश्वर राष्ट्रोळी मंदिरात पाणी शिरले.

नामोशी गिरी येथे पावसाच्या पाण्याचा निचरा होत नसल्यामुळे पंचायत घर इमारतीसह या परिसरात पूरसदृश्य स्थिती निर्माण झाली आहे. हे पाणी इमारतीत शिरल्यामुळे ग्रामपंचायत घर आठवड्यापासून बंद ठेवले आहे. पंचायत कार्यालय बंद असल्यामुळे रहिवाशांची गैरसोय होत आहे.

पेन्हा दी फ्रान्स पंचायत क्षेत्रातील माटववाडो येथे रघुनाथ राताबोले हे राहत असलेल्या घराची भिंत कोसळली. फेअरा बाईश, म्हापसा येथे तेंडुलकर निवास घराची भिंत कोसळली. तर गावसावाडा म्हापसा येथे गोलतेकर यांच्या घराची भिंत कोसळली. या तिन्ही दुर्घटनेत सुमारे ४ लाखांचे नुकसान झाले आहे.

गिरी, पर्रा, खोर्ली, कोलवाळ, आसगाव या ठिकाणी सात घरांवर झाडे कोसळली. त्यातील तीन झाडे अग्निशामक दलाच्या जवानांनी कापून बाजूला केली. तर इतर चार झाडे ही कुशल व्यक्तींच्या मार्फत कापून घेण्याचा सल्ला घर मालकांना दिला. याशिवाय गिरी, आसगाव , हणजूण, पर्रा, हणजूण, थिवी, कारोना, आल्तीन-म्हापसा, दत्तवाडी म्हापसा, पिळर्ण, पोंबुर्फा, पैठण व पर्वरी या भागात झाडे वीजवाहिन्यांसह रस्त्यांवर कोसळली. म्हापसा, पिळर्ण व पर्वरी अग्निशामल दलाच्या जवानांनी ही झाडे कापून बाजूला केली.

‘तळेश्‍वर’चे नुकसान

कोणीवाडा-कोलवाळ येथील नाला तुंबल्यामुळे पावसाचे पाणी श्री तळेश्वर राष्ट्रोळी मंदिरात शिरून नुकसान झाले. राष्ट्रीय महामार्गाच्या रुंदीकरणावेळी नदीला जोडणाऱ्या नाल्याचे नियोजनाबद्दल बांधकाम झालेले नाही. त्यामुळे पावसाच्या पाण्याचा योग्य विसर्ग होत नसल्यामुळे हा परिसर बुडाला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: 'ट्रेनच्या खिडकीतून बाहेर लटकणारे पाय अन्...'; चिमुकलीच्या व्हिडिओनं खळबळ; सोशल मीडियावर थरकाप व्हायरल

Sanjay Dutt Luxury Hotel In Goa: संजय दत्तचं गोव्यात आलिशान लक्झरी हॉटेल, उद्घाटनापूर्वीच रचला इतिहास; आंतरराष्ट्रीय स्तरावर ठरतंय चर्चेचा विषय

Vaidhriti Yoga: ऑफिसमध्ये वाद अन् प्रवासात नुकसान! सूर्य-चंद्राची अशुभ युती उडवणार झोप; वैधृती योग 'या' राशींसाठी ठरणार घातक

Delhi Student Protest: मुलांचा आक्रोश, अमानुष अत्याचार अन् रक्ताळलेलं 'आंदोलन'! शिक्षणातील लाल फितीविरुद्ध 'जेन-झी'चा आरपारचा रणसंग्राम

Anti Defection Law: सत्तेची चिता पेटवण्यासाठी निष्ठेचा बळी? राजकीय पक्षांतराच्या अनैतिक नाट्यावर ताशेरे; आमदार पळवणाऱ्या वृत्तीमुळे प्रादेशिक पक्षांचे अस्तित्व धोक्यात

SCROLL FOR NEXT