Goa Banyan Tree Fell Incident Dainik Gomantak
गोवा

Bicholim News: 'ती'ने दिली पाच तास मृत्यूशी झुंज; कारवर कोसळले वडाचे झाड

Banyan Tree Fell Incident: डिचोलीच्या महिलेची शर्थीच्या प्रयत्नानंतर सुटका; एकाच कुटुंबातील चौघे सुखरूप बचावले

गोमन्तक डिजिटल टीम

डिचोलीत वडाच्या झाडाखाली चिरडल्याने ‘कार’मध्ये अडकलेल्या ‘त्या’ महिलेने अखेर मृत्यूवर विजय मिळवण्यात यश मिळवले. तब्बल पाच तासांच्या शर्थीच्या प्रयत्नानंतर सारा मामलेकर (वय-२६) या महिलेची कारमधून सुखरूप सुटका करण्यात आली. या भयानक घटनेतून सारासह एकाच कुटुंबातील चौघे सुखरूप बचावले, तरी साराने पाच तास धीराने झुंज देत मृत्यूवर केलेली मात, मात्र प्रत्येकाच्या स्मरणात राहणार आहे.

रात्री साडेआठ वाजता सुरू झालेला हा थरार मध्यरात्री दोन वाजता संपला. झाड कोसळले, ते ‘देवा’चे झाड म्हणून ओळखण्यात येत होते. या भयानक घटनेतून कुटुंब सुखरूप बचावल्याने ‘ही ईश्वराची कृपा आहे. असे शब्द प्रत्येकाच्या तोंडून बाहेर पडत होते.

जुना बसस्थानक परिसर सदैव गजबजलेला असतो. जर हे झाड दिवसा कोसळले असते, तर भयानक आपत्ती ओढवली असती. संततधार पावसाच्या तडाख्यात काल (रविवारी) रात्री साडेआठ वाजता जुन्या बसस्थानकावरील साधारण दोनशे वर्षांपूर्वीचे वडाचे झाड आणि अन्य वेलीनी वेढलेले अवाढव्य ‘गोळ’ नामक जीर्ण झाड एका कारवर कोसळले. या झाडाने अन्य एका झाडालाही जमीनदोस्त केले.

झाड कारवर कोसळताच, कारमधील सारा मामलेकर हिच्यासह सैफुद्दीन मामलेकर (६८), सोहन मामलेकर (१८) आणि झोबेया मामलेकर (८) ही एकाच कुटुंबातील सदस्य कारमध्ये अडकली. तर याच कुटुंबातील सदस्य शोएब मामलेकर (३६) कारच्या बाहेर होते. या झाडाखाली अन्य दोन दुचाकी चिरडल्या. तर रस ऑम्लेटचा हातगाडा मोडला.

आमदार घटनास्थळी दाखल

या दुर्घटनेची माहिती मिळताच आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये आणि प्रेमेंद्र शेट घटनास्थळी दाखल झाले. त्यांच्यासह नगराध्यक्ष कुंदन फळारी आणि अन्य लोकांनी मदतकार्यात सहभाग घेतला. अग्निशमन दलाचे सहायक संचालक अजित कामतही घटनास्थळी दाखल झाले.

त्यांच्या तसेच डिचोली अग्निशमन दलाचे अधिकारी राहूल देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली मोहीम फत्ते झाली. या मोहिमेत उपअधिकारी शिवाजी नाईक आणि नामदेव तारी, चालक ऑपरेटर संदीप परब, रामदास परब, लिडींग फायर फायटर अर्जुन धावस्कर, प्रल्हाद देसाई, विठ्ठल गाड यांच्यासह सुनील गावस,रामचंद्र मळीक, हर्षद सावंत, संदीप गावस, अनुप नाईक, विष्णू राणे, आनंद नाईक, बाबुली मांद्रेकर, आदित्य गावस, महेश नाईक, सागर कुंकळेकर, सुनील बी. गावस, चारुदत्त पळ आणि अन्य जवानांनी भाग घेतला होता. म्हापसा येथील अग्निशमन दलाचीही मदत घेण्यात आली.

काळ आला होता, पण..!

मिळालेल्या माहितीनुसार काल रात्री ८.१५ वाजण्याच्या सुमारास मामलेकर कुटुंब ‘रस ऑम्लेट’ खाण्यासाठी जुन्या बसस्थानकावरील एका हातगाड्यापाशी आले होते. कार हातगाड्यापासून जवळच्या झाडाखाली उभी केली होती. यावेळी कारमध्ये दोन मुलांसह महिला आणि एक ज्येष्ठ नागरिक होते.

अचानक कारच्या बाजूने असलेले अवाढव्य झाड कारवर कोसळले. त्यासरशी कार पूर्णपणे चिरडली. हे दृष्य प्रत्येकाच्या अंगावर शहारे आणणारे होते. ही घटना इतकी भयानक होती, की कारमधील चौघाची अक्षरशः मृत्यूच्या ढातेतून सुटका झाली. ऑम्लेट हातगाडा चालविणारा ‘झिप्रो’ याला झाड कोसळण्यापूर्वी मोठा आवाज झाल्याने त्याने प्रसंगावधान राखून तेथून पळ काढला. त्यामुळे तेही सुरक्षितपणे बचावले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Crime News: 'इंदूरमध्ये लज्जास्पद' घटना! ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेटपटूंची भर रस्त्यात छेडछाड; आरोपीला अटक

हरीण, स्लॉथ अस्वल! बोंडला अभयारण्यात 12 वर्षानंतर छत्तीसगड आणि महाराष्ट्रातून येणार नवे प्राणी

Ravi Naik: ‘अरे कोकणी गोव्याची राजभाषा आहे, कोकणीत बोल'! असा अधिकाऱ्यांना आग्रह करणारे, मराठी चळवळीतले 'रवी नाईक'

अग्रलेख: वीज दरवाढीचे ओझे केवळ सामान्य गोमंतकीयांवर पडणार नाही, याची दक्षता महत्त्वाची

Super Cup 2025: धेंपो क्लबची 'सुपर' मोहीम, ईस्ट बंगालविरुद्ध बांबोळीत लढत; फातोर्ड्यात बागान-चेन्नईयीन सामना

SCROLL FOR NEXT