Deadbody Dainik Gomantak
गोवा

Goa Crime: ऑनलाइन जुगारात झाला कंगाल; ओडिशाच्या तरुणाने गोव्यात संपवले जीवन

Ponda Crime News: बेपत्ता व्यक्तीची तक्रार आणि सापडलेला मृतदेह याची तपासणी केली असता ती जुळल्याची माहिती पोलिसांनी दिली.

Pramod Yadav

फोंडा: ऑनलाइन जुगारात कंगाल झालेल्या तरुणाने गोव्यात आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. मूळ ओ़डिशाचा असणारा तरुण गोव्यातील वेलिंग, फोंडा येथे वास्तव्यास होता. मृत व्यक्ती कुंडई येथील एका खासगी कंपनीत काम करत होता.

जगबंधू धनेश्वर नायक (28, मूळ ओडिशा) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. म्हार्दोळ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पंच रुपेश नाईक यांना वन परिसरातून दुर्गंध येऊ लागला. यामुळे त्यांनी परिसराची पाहणी केली असता, जंगबंधू याचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आला.

दरम्यान, म्हार्दोळ पोलिस स्थानकात १६ जानेवारी रोजी दाखल झालेल्या बेपत्ता व्यक्तीची तक्रार आणि सापडलेला मृतदेह याची तपासणी केली असता ती जुळल्याची माहिती पोलिसांनी दिली.

नायकने गेल्या काही दिवसांपूर्वी घरी फोन करुन तो ऑनलाइन जुगारात कंगाल झाल्याची माहिती दिली होती. तसेच, घरच्यांनी त्याचा आता शोध घेऊ नये, असे देखील त्याने फोनवरुन सांगतिले होते, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. दक्षिण गोवा जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन केल्यानंतर जगबंधू धनेश्वर नायक याचा मृतदेह त्याच्या कुटुंबियांच्या स्वाधीन करण्यात आला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Omkar Elephant: गोव्यात ‘ओंकार’ हत्तीचा मुक्काम वाढला! दसऱ्यानंतरच होणार सीमोल्लंघन; म्‍हैसूरमधील उत्सवानंतर येणार पथक

Majorda: तरुणाला शिंगावर घेऊन आपटले, शिंग घुसले छातीत! 'त्या' रेड्याला पाजले होते उत्तेजक द्रव्य! 6 जणांविरोधात मनुष्यवधाचा गुन्हा

Goa Politics: व्‍हेंझी, विरियातोंविरोधात पोलिस तक्रार, भाजप कार्यालयात घुसखोरी केल्‍याचा आरोप

Rama Kankonkar: '..तर गोमेकॉबाहेर खाट घालून उपचार करु'! काणकोणकरांच्या डिस्‍चार्जबाबत कार्यकर्ते अस्‍वस्‍थ; निर्णयावरुन संशय

Horoscope: नवरात्रीचा तिसरा दिवस, 'या' 4 राशींवर राहील देवीचा आशीर्वाद; कौटुंबिक मतभेद मिटतील आणि मानसिक समाधान लाभेल

SCROLL FOR NEXT