Bank 

 

Dainik Gomantak 

गोवा

वास्कोतील बँकांचा संप; खातेधारकांची गैरसोय

युनायटेड फोरम ऑफ बँक युनियनने सार्वजनिक क्षेत्रातील बँकाचे खासगीकरण करण्याच्या केंद्राच्या निर्णयाच्या निषेधार्थ संपाची हाक दिली आहे.

दैनिक गोमन्तक

वास्को: स्टेट बँक ऑफ इंडिया सह सार्वजनिक क्षेत्रातील बँकांनी (Bank) आज व उद्या शुक्रवार असे दोन दिवसांचा संप पुकारला असून याला वास्कोतील बँकांचा शंभर टक्के प्रतिसाद लाभला. युनायटेड फोरम ऑफ बँक युनियनने सार्वजनिक क्षेत्रातील बँकाचे खासगीकरण करण्याच्या केंद्राच्या निर्णयाच्या निषेधार्थ संपाची हाक दिली आहे.

सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या खाजगीकरणामुळे सामान्य लोकांचा आणि देशातील मागासलेल्या प्रदेशाचं हित धोक्यात येईल असा दावा युएफबीयुने केला आहे.

दरम्यान, केंद्र सरकारने (Central Government) सरकारी बँकांच्या खासगीकरणाचा घाट घातल्याने याचा निषेध करण्यासाठी दोन दिवस देशातील सरकारी कर्मचारी संपावर गेले आहेत. त्यानुसार आज पहिल्या दिवशी वास्कोतील सर्व राष्ट्रीयीकृत बँका पूर्णवेळ बंद ठेवण्यात आल्या होत्या. काही खातेधारकांना या संपाची माहिती नसल्याने बँकेत आले असता त्यांना बँका बंद असलेल्या आढळल्याने त्यांना माघारी परतावे लागले. येथील बँक ऑफ इंडिया, स्टेट बँक ऑफ इंडिया, पंजाब नॅशनल बँक, सिटीजन बँक, कॉर्पोरेशन बँक, सारस्वत बँक, सिंडिकेट बँक, युको बँक, देना बँक आदी राष्ट्रीयकृत बँका बंद ठेवून या संपाला वास्कोतील (Vasco) शाखानीही पाठिंबा दर्शविला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Apostille Process: परदेशात जाणाऱ्या गोवेकरांसाठी खूशखबर! कागदपत्रांच्या पडताळणीची प्रक्रिया झाली सुलभ; सरकारकडून 'SOP' जाहीर

Babush Monserrate Santa Cruz Office: "परवानगी मागितली असती तर नकारच दिला असता!", बाबूश मोन्सेरात यांच्या कार्यालयावरुन भाजप प्रदेशाध्यक्षांनी स्पष्टच सांगितलं

Konkan to Akkalkot ST Bus: कोकणवासीयांसाठी स्वामींचं दर्शन झालं सोपं! सिंधुदुर्गातून अक्कलकोटसाठी रोज धावणार 'लालपरी'; मार्ग, वेळ जाणून घ्या

VIDEO: वंदे भारतमध्ये धक्कादायक प्रकार! रेल्वे अधिकाऱ्याच्या पत्नीने ड्रायव्हर केबिनमध्ये बनवली रील; व्हिडिओ Viral होताच कारवाईचे आदेश

Jharkhand Mob Lynching: अल्पवयीन मुलीवरील अत्याचाराच्या आरोपातून 150 जणांच्या जमावाकडून तरुणाची हत्या; आई-वडिलांना बांधून मुलावर काठ्या-दगडांनी हल्ला

SCROLL FOR NEXT