Suchana Seth Case Dainik Gomantak
गोवा

Suchana Seth Case: स्वतःच्या लहानग्या मुलाचा खून केलेल्या सूचना सेठचा जामिनासाठी पुन्हा प्रयत्न

Suchana Seth CEO Case: गेल्या दहा महिन्यांपासून कोळवळ येथील तुरुंगात असलेल्या सूचना सेठ हिने आता मुलाच्या हत्येसंदर्भात पुन्हा एकदा जमिनीसाठी अर्ज केला आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

गोवा: स्वतःच्या चार वर्षांच्या चिमुकल्याचा खून केल्याप्रकरणी काही महिन्यांपूर्वी बंगळूर येथील एका एआय स्टार्टअप कंपनीची सीइओ सूचना सेठ हिला गोवा पोलिसांनी अटक केली होती. तपासानंतर पती पत्नीमधील वादामुळे सूचनाने तिच्या मुलाची हत्या केल्याची माहिती समोर आली होती. गेल्या दहा महिन्यांपासून कोळवळ येथील तुरुंगात असलेल्या सूचना सेठ हिने आता मुलाच्या हत्येसंदर्भात पुन्हा एकदा जमिनीसाठी अर्ज केला आहे.

यापूर्वी देखील सूचना हिने अनेकवेळा जामिनासाठी अर्ज केला होता मात्र तो अर्ज फेटाळण्यात आला. काल मंगळवारी (दि. १५ ऑक्टोबर) रोजी या प्रकरणावर सुनावणी झाली होती. आरोपपत्र सादर केल्यांनतर सूचनाने पुन्हा एकदा जामिनासाठी अर्ज केलाय तर सरकारी वकिलाने प्रतिज्ञापत्र सादर करण्यासाठी आणखीन एका आठवड्याची मुदत मागितली आहे आणि म्हणूनच आता २२ ऑक्टोबर या दिवशी संपूर्ण प्रकरणावर पुन्हा एकदा कोर्टाची सुनावणी होईल.

बंगळूरहुन आलेल्या सूचना सेठ हिला मुलाचा मृतदेह बॅगमध्ये भरून पळून जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली व कांदोळी येथील एका हॉटेलमध्ये राहिलेली सूचना मुलाच्या मृतदेहासह ६ जानेवारी रोजी बंगळूरला जायला निघाली असतानाच तिला चित्रदुर्ग येथे मुलाच्या मृतदेहासह अटक करण्यात आली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Bicholim: डिचोली येथील बगलमार्गावर दरडीचा धोका; कोसळण्याची भीती वाढली, रेलिंगला अडकलेली दरड वर्षभर 'जैसे थे'

Yashasvi Jaiswal Fight: LIVE सामन्यात हायव्होल्टेज ड्रामा! यशस्वी जयस्वाल श्रीलंकन गोलंदाजाच्या अंगावर गेला; डोकं आपटलं, धक्का दिला अन्... Watch Video

Sarmanas Pilgaon Road: सारमानस रस्त्यावरील धूळ-चिखलाच्या समस्येवरून प्रेमेंद्र शेट आक्रमक, खनिज वाहतूक रोखली

आरोप निश्चितीपूर्वी आरोपीची बाजू ऐकून घेणे बंधनकारक; उच्च न्‍यायालयाकडून सत्र न्यायालयाचा आदेश रद्द

Illegal Massage Parlours: मसाज पार्लरविरोधात लोबोंचे पत्र; कळंगुटमध्ये बेकायदा आस्थापने सुरू असल्याचे नमूद

SCROLL FOR NEXT