Banastarim Bridge Accident Dainik Gomantak
गोवा

Banastarim Bridge Accident: बाणास्तरी अपघातातील संशयित कारचालक परेशच्या जामिन अर्जावरील सुनावणी तहकूब

गोवा खंडपीठाचा निर्णय

गोमंतक ऑनलाईन टीम

Banastarim Mercedes Accident: बाणस्तारी येथील पुलावर झालेल्या मर्सिडीज कारच्या अपघात प्रकरणाचा तपास गोवा सरकार क्राईम ब्रँचकडे देण्याची शक्यता असल्याची माहिती सरकारी वकिलांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात गुरूवारी दिली.

त्यामुळे या मर्सिडीज कार चालक संशयित श्रीपाद ऊर्फ परेश सावर्डेकर याच्या जामीन अर्जावरील सुनावणी गोवा खंडपीठाने सोमवारपर्यंत तहकूब केली.

दरम्यान, मर्सिडीस कारची मालक मेघना सिनाय सावर्डेकर हिच्या अटकपूर्व जामीन अर्जावरील सुनावणी फोंडा येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाने 23 ऑगस्टपर्यंत पुढे ढकलली आहे. तर सुमारे 8 दिवस पोलिस कोठडीत राहिल्यानंतर न्यायालयाने त्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी दिली आहे.

कुंभारजुवेचे आमदार राजेश फळदेसाई यांनी हा तपास क्राईम ब्रँचकडे देण्याची मागणी केली होती. ती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी मान्य केली.

पोलिसांनी त्याच्या जामिनाला उच्च न्यायालयात विरोध दर्शविला आहे. तपास अद्याप पूर्ण झालेला नाही. काहींच्या साक्षी नोंदवायच्या आहेत. संशयित राजकीयदृष्ट्या वजनदार व्यक्ती असल्याने साक्षीदारांवर दबाव टाकू शकतो, असे पोलिसांनी म्हटले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Weather Update: राज्यात पावसाचा जोर ओसरणार? कमी दाबाच्या पट्ट्यामुळे झालेल्या पावसानंतर पुढील 4 दिवस तुरळक सरींचा अंदाज, शेतकऱ्यांची चिंता कायम

VIDEO: भाजपवर सरदेसाईंचा जोरदार हल्लाबोल; 'वोट चोरी'चा आरोप करत म्हणाले, विधानसभा निवडणूक हलक्यात घेता येणार नाही

8th Pay Commission: 45,000 किमान पेन्शन मिळणार? 8व्या वेतन आयोगासमोर पेन्शनर्सनी मांडल्या ‘या’ मागण्या

West Zone Athletics: पश्चिम विभागीय ॲथलेटिक्ससाठी गोवा सज्ज, यजमानांचा 124 सदस्यीय संघ; स्पर्धा रविवारपासून अटल स्टेडियमवर

Vasco: एकाच मार्गावर वेगवेगळी वेगमर्यादा, वास्कोतील वाहनचालक चक्रावले; दोन सरकारी खात्यांत समन्वयाचा अभाव

SCROLL FOR NEXT