Major Accident On Banastarim Bridge  Dainik Gomantak
गोवा

बाणस्तारी अपघात! सावर्डेकरांच्या कारने दोन महिन्यांत सहावेळा केले वेगमार्यादेचे उल्लंघन, परवाना होणार रद्द

राज्य परिवहन संचालनालयाने स्वत:हून गुन्ह्यांची दखल घेतली असून, मेघना सावर्डेकर यांचा परवाना रद्द केला जाणार आहे.

Pramod Yadav

Banastarim goa bridge accident: बाणस्तारी येथे रविवारी रात्री झालेल्या भीषण अपघातात तिघांचा मृत्यू झाला. तर, अन्य तिघे गंभीर अवस्‍थेत गोमेकॉत उपचार घेत आहेत. मद्यधुंद अवस्‍थेत कार चालवत अपघातास कारणीभूत ठरलेला कारचालक श्रीपाद ऊर्फ परेश सिनॉय सावर्डेकर (48) याला पोलिसांनी अटक केलीय.

अपघातातील या कारवर यापूर्वी सहावेळा वेगमर्यादा उल्लंघन केल्याप्रकरणी दंड ठोठावण्यात आला आहे. राज्य परिवहन संचालनालयाने स्वत:हून गुन्ह्यांची दखल घेतली असून, मेघना सावर्डेकर यांचा परवाना रद्द केला जाणार आहे.

अशाप्रकारच्या जीवघेण्या अपघातांच्या प्रकरणात परवाने रद्द करण्याची कारवाई विभाग स्वत:हून करेल, अशी माहिती परिवहन संचालक राजन सातार्डेकर यांनी टाईम्स ऑफ इंडिया वृत्तपत्राला दिली आहे.

निष्काळजीपणे वाहन चालवणे, मद्यपान करून वाहन चालवणे, इत्यादी गंभीर गुन्ह्यांत अपराधी आढळल्यास, किमान एक वर्षासाठी ड्रायव्हिंग लायसन्स निलंबित केले जाईल किंवा आवश्यक वाटल्यास ते रद्द देखील केले जाऊ शकतात.

एआय कॅमेऱ्यांनी गेल्या दोन महिन्यांत सावर्डेकर यांच्या कारने वेगाचे सहावेळा उल्लंघन केल्याचे आढळून आले आहे, ज्यासाठी त्यांना प्रत्येक उल्लंघनासाठी 1,000 रुपये दंड आकारण्यात आला आहे. यापैकी दोन चालान तासांच्या अंतराने एकाच दिवशी वेगात चालवल्याबद्दल जारी करण्यात आली.

सावर्डेकर यांच्या कारवर केरळ आरटीओने देखील वेग मर्यादेचे उल्लंघन केल्याप्रकरणी चलन जारी केले आहे, ज्यासाठी 1,500 रुपये दंड आकारण्यात आला आहे. अद्याप हा दंड भरलेला नसल्याचे परिवहन विभागातील सूत्रांनी सांगितले.

वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्याला पहिल्यांदा 1,000 रुपये आणि त्यानंतर 1,500 रुपये दंड आकारला जातो.

तिसऱ्यांदा वेग मर्यादेचे उल्लंघन केल्यानंतर चालकाचा परवाना स्वयंचलितपणे रद्द करण्यासाठी एआयमध्ये प्रोग्राम केले आहे. दरम्यान, परवाना निलंबित करण्यापूर्वी परिवहन कायद्यांतर्गत आरटीओची सुनावणी आवश्यक असल्याचे कायदा सांगतो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Online Betting Raid: गोवा पोलिसांचा डबल धमाका! ऑनलाइन सट्टेबाजी आणि दलालांवर एकाच वेळी कारवाईचा बडगा

Dewald Brevis: 22 वर्षीय बेबी एबीचं वादळ, ऑस्ट्रेलियाला धुतलं, विराट कोहली- बाबर आझमचा विक्रम उद्ध्वस्त

Goa Tourism: 'अन्यथा पर्यटन सेवा बंद करू!' म्हादईवरील रिव्हर राफ्टींग निधीसाठी पंचायत आक्रमक

Cristiano Ronaldo In Goa: गोव्यात 'ख्रिस्तियानो रोनाल्डो'ला पाहण्याचे स्वप्न अधांतरी; खेळण्याबाबत अनिश्चितता कायम

Rahul Gandhi: "चोरी चोरी, चुपके चुपके..." राहुल गांधींनी केला 'वोट चोरीचा' व्हिडिओ; निवडणूक आयोगावर साधला निशाणा

SCROLL FOR NEXT