Banastarim Bridge Accident Mercedes Driver  Dainik Gomantak
गोवा

Banastarim Bridge Accident: चालक परेश सावर्डेकरच्या पोलिस कस्टडीत वाढ; पुढील सुनावणी 16 ऑगस्टला

पोलिसांचा ससेमिरा चुकविण्यासाठी मेघनाचा आटापिटा सुरूच

दैनिक गोमन्तक

Banastarim Bridge Accident: बाणस्तारी अपघात प्रकरणाने संपूर्ण राज्याला हादरवून सोडले. यानंतर या घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी जोर धरू लागली. यामध्ये संशयित परेश सिनाय सावर्डेकर काही दिवसांपासून पोलिस कस्टडीत होता. आता त्याची कस्टडी अजून एक दिवसाने वाढवण्यात आली आहे.

अटक केलेल्या परेश सिनाय सावर्डेकरच्या पोलिस कस्टडीत एका दिवसाची वाढ. उत्तर गोवा जिल्हा सत्र न्यायालयाने परेशला एका दिवसाच्या रिमांडवर पोलिस कस्टडीत पाठविले आहे.पाच दिवसांचा रिमांड संपल्याने फोंडा न्यायालयात म्हार्दोळ पोलिसांनी त्याला दाखल केले होते.

परेश आणि मेघना या दोघांचीही पुढील सुनावणी 16 ऑगस्टला होणार आहे.

दरम्यान, या प्रकरणात चालक परेश सावर्डेकर याला अटक केली असली तरी त्याची पत्नी मेघना सावर्डेकर हिने पोलिस चौकशीला सामोरे जावे लागू नये, यासाठी अटकपूर्व जामीन तसेच उपचारासाठी खासगी इस्पितळात दाखल होऊन पोलिसांचा ससेमिरा चुकविण्याचा आटोकाट प्रयत्न सुरू केला असल्याचे बोलले जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: विराट कोहलीला चाहत्याने अचानक दाखवला बूट; काही क्षण गोंधळला, मग असा होता रिअ‍ॅक्शन! व्हिडिओ व्हायरल

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! 7-8 ऑक्टोबरला बंगळुरूत 8व्या वेतन आयोगाची बैठक; पगार, पेन्शन आणि फिटमेंट फॅक्टरवर मंथन

Coal Transportation: कोळसा वाहतुकीला वेग; सहा महिन्यांत 11.4 टक्के वाढ, दक्षिण पश्चिम रेल्वेची 5.36 दशलक्ष टन वाहतूक

Cyber Fraud Alert: ना ऑर्डर, ना पेमेंट… तरी घरी आलं पार्सल! चुकूनही सांगू नका OTP; सायबर ठगांचा नवा फंडा, एका चुकीने रिकामं होऊ शकतं खातं!

Mango Tree Fall: आंब्याची महाकाय फांदी अचानक कोसळली; चार वाहनांचे मोठे नुकसान, सुमारे 5 लाखांचा फटका

SCROLL FOR NEXT