Ban on inland water movement in goa Dainik Gomantak
गोवा

पंतप्रधानांच्या दौऱ्यामुळे गोव्यात जलवाहतुकीवर निर्बंध, कसिनोला झुकतं माप?

बंदर कप्तान विभागाच्या निर्बंधांमुळे स्थानिक व्यावसायिकांमध्ये नाराजी

आदित्य जोशी

पणजी : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या गोवा दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवला आहे. बंदर कप्तान विभागाने पाण्यातून होणारी वाहतूक काहीकाळ बंद ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. मांडवी आणि झुआरी नदीतील जलवाहतूक बंद राहणार असल्याने स्थानिक व्यावसायिक मात्र नाराज असल्याचं चित्र आहे. (PM Modi Goa Visit effect: Ban on Inland Water Movement in Goa)

बंदर कप्तान विभागाने जारी केलेल्या नोटीसनुसार पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या (Narendra Modi) 10 फेब्रुवारीच्या दौऱ्यामुळे दुपारी 2 ते रात्री 9 दरम्यान मांडवी आणि झुआरी नदीतील जलवाहतूक बंद राहणार आहे. यात अत्यावश्यक सेवेला वगळण्यात आले असून इतर सर्व व्यवसायांवर निर्बंध लादण्यात आले आहेत. त्यामुळे लहान मोठ्या बार्ज, प्रवासी बोट, मासेमारीसाठी वापरल्या जाणाऱ्या बोट्स, ज्या बोटी स्वयंचलित किंवा मानवचलित असतील, क्रूझ यांच्या वाहतूकीवर परिणाम होणार आहे. मात्र असं असलं तरीही कसिनोला (Casino) यातून सूट देण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.

मच्छिमाराकडून बंदर कप्तान खात्याच्या या निर्णयावर नाराजी व्यक्त केली जात आहे. आपण दररोज मासेमारी करण्यासाठी नदीमध्ये जातो मात्र एखादा दिवसही जर मासेमारी बंद ठेवली तर मोठं नुकसान होतं. कोरोनामुळे आधीच मासेमारी (Fishing) व्यवसायाचं मोठं नुकसान झालं आहे. त्यात अशी मासेमारी बंद ठेवल्यास आणखी तोटा सहन करावा लागणार असल्याची भीती मच्छिमारांनी व्यक्त केली आहे. कसिनोवर कोणतेही निर्बंध न लादल्याने बंदर कप्तान विभागाच्या निर्णयावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT