No Water Canva
गोवा

Water Crisis: मार्चमध्ये पाण्याची ही स्थिती, तर एप्रिल-मेमध्ये काय? मल्टिप्लेक्स, बंगल्यांमुळे राज्‍यात पाणीटंचाई; फेरेरांचे आरोप

Carlos Ferreira: मल्टिप्लेक्स आणि उच्चभ्रू बंगल्यांसाठी नवीन बांधकाम परवाने देण्यावर बंदी घालण्यात यावी, अशी मागणी हळदोणेचे काँग्रेसचे आमदार अ‍ॅड. कार्लुस फेरेरा यांनी केली.

Sameer Panditrao

Carlos Ferreira About Water Crisis

बार्देश: मल्टिप्लेक्स आणि उच्चभ्रू बंगल्यांसाठी नवीन बांधकाम परवाने देण्यावर बंदी घालण्यात यावी, अशी मागणी हळदोणेचे काँग्रेसचे आमदार अ‍ॅड. कार्लुस फेरेरा यांनी केली. एकंदरीत स्थिती पाहिल्यास नियोजन आणि समन्वयाबाबत सरकार सपशेल अपयशी ठरले आहे, असा आरोपही त्‍यांनी केला.

संपूर्ण राज्‍य पाणीटंचाईच्या समस्येने त्रस्त आहे. जलस्रोतांचा गैरवापर होत आहे. जर सरकारने पाण्याची बचत करण्‍याकडे लक्ष दिले असते तर उन्हाळ्यात पाण्‍याची समस्‍या जाणवली नसती, असे फेरेरा म्हणाले. मार्चमध्ये ही स्थिती आहे तर एप्रिल, मे महिन्यात काय, याची कल्पनाच करवत नाही. माझ्या मतदारसंघातील लोकांना पंधरा-वीस मिनिटेही पाणी मिळत नाही, असेही त्‍यांनी सांगितले.

मल्टिप्लेक्स आणि इतर गोष्टींना सरकार परवानगी देत आहे. या वसाहतींमध्ये पाण्याचा मोठ्या प्रमाणात वापर होतो. प्रत्येक बंगल्यात जलतरण तलाव असतो. त्यांना पाणी कुठून आणायचे? पाण्याची व्यवस्था मालक स्वत:च करतील, असे सरकारकडून सांगितले जाते. पण प्रत्यक्षात तसे काहीच होत नाही. जलतरण तलावांची वेळोवेळी साफसफाई करावी लागते. त्यात पुन्हा पाणी भरावे लागते. परिणामी लोकांना प्‍यायला पाणी मिळत नाही, असा दावा युरी आलेमाव यांनी केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT