BJP MLA Premendra Shet Dainik Gomantak
गोवा

गोव्यात दारुवर बंदी घाला! CM प्रमोद सावंत यांच्या सरकारमधील आमदाराची विधानसभेत मागणी

Goa Legislative Assembly Monsoon Session 2024: गोवा पावसाळी अधिवेशनाच्या बाराव्या दिवशी मागण्या आणि कपात सूचना सत्रात मयेचे आमदार प्रेमेंद्र शेट यांनी याबाबत मागणी केली.

Pramod Yadav

Ban Liquor In Goa, Demand BJP MLA

पर्वरी: गोव्यात मद्याच्या आहारी गेलेल्या तरुणाची संख्या वाढली आहे. काहीजणांचा अतिमद्य सेवन केल्याने मृत्यू देखील झालाय. देशातील विविध राज्यांनी मद्यावर बंदी घातलीय, त्याच प्रमाणे गोव्यात देखील दारुवर बंदी घालावी, अशी मागणी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या सरकारमधील एका आमदाराने पावसाळी अधिवेशनात केली.

गोवा पावसाळी अधिवेशनाच्या बाराव्या दिवशी मागण्या आणि कपात सूचना सत्रात मयेचे आमदार प्रेमेंद्र शेट यांनी याबाबत मागणी केली. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याकडे असलेल्या उत्पादन शुल्क विभाग, कोषागार आणि लेखा प्रशासन यासह विविध खात्यासंबधित मागण्यावर सत्ताधारी व विरोधी बाकावरील आमदारांनी मतं मांडली.

यावेळी बोलताना आमदार प्रेमेंद्र शेट यांनी राज्यात मद्य सेवन करण्यावर बंदी घालावी अशी मागणी केली. शेट यांच्या मागणीवरुन सभागृहात एकच हाशा पिकला. गोव्यात मद्य उत्पादन करावे मात्र त्याच्या सेवनावर बंदी घालावी, अशी मागणी शेट यांनी केली.

राज्यात तरुणांमध्ये मद्याच्या आहारी गेलेल्या तरुणांचे प्रमाण वाढले आहे. यामुळे अकाली मृत्यू होणाऱ्या नागरिकांची संख्या देखील कमालीची वाढल्याचे प्रेमेंद्र शेट म्हणाले. त्यामुळे गोव्यात मद्यबंदीचा सरकारने विचार करावा असे त्यांनी सूचवले.

प्रेमेंद्र शेट यांच्या या मागणीला कुडतरीचे अपक्ष आमदार आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स यांनी विरोध दर्शवला. मद्यबंदी पेक्षा मद्य सेवनावर नियम लागू करावेत असे लॉरेन्स यांनी सूचवले. तसेच, ऑनलाईन पद्धतीने मद्य मागवता येईल, असे काही प्रकार करु नयेत असेही लॉरेन्स म्हणाले.

मद्याची किंमत कमी करा

यापूर्वी भाजप आमदार आणि माजी मंत्री निलेश काब्राल यांनी राज्यातील मद्याच्या किमती कमी करण्याची मागणी केली. गोवा पर्यटन राज्य म्हणून ओळखले जाते. पण, इतर राज्यात मोठे मद्याचे ब्रँड कमी किमतीत विकले जातात. यामुळे पर्यटक गोव्याकडे पाठ फिरवतात.

याचा गोव्याच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम होतो, त्यामुळे राज्य सरकारने मद्याच्या किमती कमी करण्याबाबत विचार करावा अशी सूचना आमदार काब्राल यांनी केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Today's News Live: कुंकळ्ळीतील 100 घरांवर पडणार हातोडा! हायकोर्टाचा आदेश

Raechelle Banno: 'IFFI ला माझ्या चित्रपटाने सुरुवात झाली हे पाहून आनंद झाला'; बेटर मॅनच्या अभिनेत्रीने भूमिकेच्या दबावाबद्द्ल मांडले मत

Saint Francis Xavier Exposition: वाजत गाजत निघाली गोंयचो सायबाची मिरवणूक; पहिल्या सोहळ्याचे खास Video पाहा

Goa Government: गोवा सरकारचा मोठा निर्णय; अपघातग्रस्तांना 10 लाखापर्यंत मिळणार नुकसान भरपाई

Sunburn Festival: हा सूर्य हा जाळ

SCROLL FOR NEXT