Bambolim Pedestrian Footbridge Dainik Gomantak
गोवा

Bambolim Pedestrian Footbridge: बांबोळीतील पादचारी पुलाचा अंदाज चुकला! काम फसले, आता 1 नोव्हेंबरचा मुहूर्त

Bambolim Traffic Diversion: बांबोळी येथील ‘फुलांचो खुरिस’ परिसरात राष्ट्रीय महामार्गावर उभारण्यात आलेल्या लोखंडी खांबांवर पादचारी पुलाची संरचना बसविण्याचे काम नियोजनाचा अभाव आणि तांत्रिक अडचणींमुळे रविवारी फसले.

गोमंतक ऑनलाईन टीम

पणजी: बांबोळी येथील ‘फुलांचो खुरिस’ परिसरात राष्ट्रीय महामार्गावर उभारण्यात आलेल्या लोखंडी खांबांवर पादचारी पुलाची संरचना बसविण्याचे काम नियोजनाचा अभाव आणि तांत्रिक अडचणींमुळे रविवारी फसले. त्यामुळे हे काम आता पुढील रविवारी, १ नोव्हेंबर रोजी करण्यात येणार आहे.

या कामासाठी रविवारी उत्तररात्री १ ते सकाळी ६ या वेळेत महामार्गावरील वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात आली होती. मात्र, पादचारी पुलाच्या लांबीचा अंदाज न आल्याने वर उचललेली संरचना पुन्हा खाली उतरवावी लागल्याचे समजते. संरचनेत आवश्यक सुधारणा केल्यानंतर ती पुन्हा बसविण्यात येणार आहे. यासाठी पुन्हा वाहतूक वळविण्यात येणार असल्याने वाहनचालकांना पर्यायी मार्गांचा वापर करावा लागेल.

लोकांना मन:स्‍ताप

बांबोळी येथील राष्ट्रीय महामार्ग-६६ वर पादचारी पुलाची संरचना बसविण्याचे काम आता १ नोव्हेंबर रोजी (रविवारी) पुन्हा हाती घेण्यात येणार आहे. यावेळीही कामाच्या कालावधीत वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात येईल, असे समजते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sindhudurg Crime: ऑनलाइन गेमिंगचं कर्ज, हप्त्यांचा ताण अन् टोकाचं पाऊल! तेरेखोल नदीपात्रात माय- लेकानं एकत्र उडी घेत संपविले जीवन

Gas Cylinder Explosion: भोममध्ये गॅस सिलिंडरचा भीषण स्फोट! घराचे छप्पर उडाले; दाम्पत्य बालंबाल बचावले, 10 लाखांचे नुकसान

Driving Licence New Rules: ड्रायव्हिंग लायसन्सच्या नियमांत मोठे बदल! भारतीय आणि विदेशी नागरिकांसाठी वेगवेगळ्या रंगांचे DL, नाव-पत्ता बदलण्याची सुविधा मोफत

Vedanta Flyover: वेदान्ताच्या फ्लायओव्हरला मये ग्रामसभेचा विरोध! ठराव संमत; एनओसी मागे घेण्याची मागणी

Horoscope: आठवड्याची सुरुवात ठरणार धमाकेदार! सोमवारच्या दिवशी 'या' 4 राशींचे नशीब चमकणार, नोकरीत यश मिळणार

SCROLL FOR NEXT