Panchayat Budget Dainik Gomantak
गोवा

पैंगीण पंचायतीचे शिलकी अंदाजपत्रक संमत

सरकारच्या वेगवेगळ्या अनुदानातून पंचायतीला 2 कोटी 20 लाख 38 हजार रुपयांचा निधी मिळेल.

दैनिक गोमन्तक

काणकोण: पैंगीण पंचायतीचे 2022 ते 2023 या आर्थिक वर्षाचे शिलकी अंदाज पत्रक पंचायत मंडळाच्या बैठकीत समंत करण्यात आले आहे, त्याला ग्रामसभेनेही मान्यता दिली आहे.

या अंदाजपत्रकात आर्थिक वर्षाअखेर पंचायत खात्यात 3 कोटी 17 लाख 21 हजार रुपये शिल्लक दाखविण्यात आली आहे. तर आरंभी शिल्लक 2 कोटी 20 लाख रुपये आहे.सरकारच्या वेगवेगळ्या अनुदानातून पंचायतीला 2 कोटी 20 लाख ३८ हजार रुपयांचा निधी मिळेल, अशी अपेक्षा आहे.

त्याशिवाय वेगवेगळ्या करातून पंचायतीला 12 लाख 2 हजार रुपयाचे उत्पन्न मिळणार आहे. शुल्काच्या माध्यमातून पंचायतीला 6 लाख रुपये मिळतील. अन्य स्रोतातून पंचायतीला 16 लाख 55 हजार रुपयांचा निधी अपेक्षित आहे. आर्थिक वर्षात पंचायतीला 1कोटी 59 लाख 39 हजार रुपये खर्च अपेक्षित आहे. त्यामध्ये कार्यालयीन खर्च 21 लाख 38 हजार, स्वच्छता व सार्वजनिक आरोग्य यासाठी 5 लाख, सार्वजनिक बांधकामसाठी 1 कोटी 8 लाख, समाज कल्याणसाठी 1 लाख 50 हजार, शिक्षण व संस्कृतीसाठी 2 लाख 50 हजार, पेय जल 1 लाख रुपये, ग्रामीण स्वच्छता 7 लाख 60 हजार, कोंडवाड्यासाठी 3 लाख रुपये व अन्य खर्चासाठी 9 लाख 1 हजार रुपयांची तरतूद केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Operation Sindoor: पाकिस्तान भारताविरुद्ध अण्वस्त्रांचा वापर करणार होता? शाहबाज शरीफ यांनी स्पष्टच सांगितलं

John Cena: 'You Can't See Me' आता शेवटचं? जॉन सीनाचं WWE मधील फेअरवेल मॅच लीक, 'या' वर्ल्ड चॅम्पियनविरुद्ध होणार सामना

IND VS ENG: हरमनप्रीत कौरचा जलवा! आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये गाठला आणखी एक टप्पा, मिताली राजचा मोडला रेकॉर्ड

Radha Yadav Catch: राधा यादवचा 'सुपरवुमन' अवतार! हवेत झेप घेत पकडला अविश्वसनीय झेल, पाहा Video

Chemical Free Fruits Goa: गोव्यात मिळणार रसायनमुक्त फळे! कृषी विभागाने दिली खुशखबर; Watch Video

SCROLL FOR NEXT