Baina robbery investigation Dainik Gomantak
गोवा

Baina Dacoity: 6वा मजला, 6 दिवस, 6 आरोपी! 'गोवा पोलिसांनी करून दाखवलं'; बायणा दरोडा प्रकरणी पीडित कुटुंबाला मोठा दिलासा

Baina dacoity case: या जलद कारवाईबद्दल दरोड्यात गंभीर जखमी झालेले सागर नायक यांनी गोवा पोलिसांच्या कार्यक्षमतेचे तोंडभरून कौतुक केले

Akshata Chhatre

वास्को: वास्को, बायणा येथील चामुंडा आर्केडमध्ये सागर नायक यांच्या फ्लॅटवर सशस्त्र दरोडा टाकणाऱ्या आणखी एका संशयित आरोपीला गोवा पोलिसांनी अटक केली आहे. या घटनेतील आरोपींची एकूण संख्या आता सहा झाली आहे. या जलद कारवाईबद्दल दरोड्यात गंभीर जखमी झालेले सागर नायक यांनी गोवा पोलिसांच्या कार्यक्षमतेचे तोंडभरून कौतुक केले आहे.

"पोलिसांवर माझा विश्वास होता!"

बायणा येथील सागर नायक यांच्या फ्लॅटवर दरोडेखोरांनी सशस्त्र हल्ला करून ३५ लाखांचा ऐवज लंपास केला होता. या घटनेनंतर गोवा पोलिसांच्या तपासकामाच्या प्रगतीबद्दल वास्कोवासीय उलटसुलट चर्चा करत होते. अनेकजण पोलिसांच्या कामाबद्दल संशय व्यक्त करत असताना, पीडित सागर नायक यांनी मात्र पोलिसांवर पूर्ण विश्वास दर्शवला.

६ दिवसांत कारवाई

नायक यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, "मला वाटलंही नव्हतं, पण गोवा पोलिसांनी केवळ सहा दिवसांत आरोपींना ताब्यात घेतले आहे." गोवा पोलिसांनी पहिल्या दिवसापासून माझी मदत केली. या चोरांचा शोध घेण्यासाठी त्यांनी दिवसाची रात्र केली, असे त्यांनी नमूद केले. गोवा जरी छोटे राज्य असले तरी, चोरांना लपण्यासाठी अनेक जागा आहेत. मात्र, गोवा पोलिसांनी गोव्याची सीमा पार करत बंगळूरमधून या चोरांना ताब्यात घेतले, याबद्दल नायक यांनी पोलिसांच्या कामाची प्रशंसा केली.

दरोड्याचा थरार आणि नायकांची दुखापत

दरोडेखोरांनी सागर नायक, त्यांची पत्नी हर्षा आणि मुलगी नक्षत्रा यांना मारहाण केली होती. या हल्ल्यात सागर नायक गंभीर जखमी झाले होते. सहाव्या मजल्यावर असलेल्या फ्लॅटवर हल्ला करत दरोडेखोरांनी कुटुंबाला मारहाण करून भीतीचे वातावरण निर्माण केले होते. पीडित सागर नायक यांनी पोलीस खात्यासोबतच मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचेही आभार मानले आहेत. गोवा पोलिसांनी केलेल्या या जलद आणि प्रभावी कारवाईमुळे वास्कोवासीयांना मोठा दिलासा मिळाला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

संपादकीय: पोलिसांचे मनोबल उंचावण्याची गरज, बेतुल मारहाण ते दरोडेखोरांची दगडफेक; गोव्याच्या कायदा-सुव्यवस्थेचे विषण्ण चित्र!

Goa Zilla Panchayat Election: बोरी आणि शिरोड्यात आता 'महिलाराज'! दोन्हीही जागा महिलांसाठी आरक्षित; विद्यमान जिल्हा पंचायत सदस्यांचा पत्ता होणार कट

Hanuman Chalisa Video: ऐतिहासिक विक्रम! 'श्री हनुमान चालीसा' 5 अब्ज व्ह्यूज ओलांडणारा भारतातील पहिला व्हिडिओ; जागतिक यादीत समावेश

Syed Mushtaq Ali Trophy: सय्यद मुश्ताक अली करंडक स्पर्धेत गोव्याचा पहिल्या सामना उत्तर प्रदेशशी; रणजीच्या अपयशानंतर टी-20 मध्ये कामगिरी सुधारण्याचे आव्हान!

Cooch Behar Trophy: गोव्याची विजयी घोडदौड! मिहीर कुडाळकरच्या फिरकीच्या जाळ्यात आसामचे फलंदाज अडकले; दुसऱ्या सामन्यात एक डाव आणि 215 धावांनी दिली मात

SCROLL FOR NEXT