बैलपार नदी Dainik Gomantak
गोवा

'बैलपार नदीत बसून करणार जलआंदोलन'

रविवारी सकाळी 11 वाजल्यापासून जलआंदोलन सुरू केले जाईल.

दैनिक गोमन्तक

पेडणे: पेडणे तालुक्यात भविष्यात जलसंकट उद्‌भवू शकते. याची चाहूल लागल्यामुळे आणि बैलपार नदीचे पाणी इतरत्र वळवण्याचा प्रयत्न होत असल्याने उद्या रविवार दि. 1 मे रोजी ‘चलो बैलपार जलआंदोलना’ची हाक मोपा विमानतळ पंचक्रोशी पीडित जनसंघटनेने दिली आहे.

रविवारी सकाळी 11 वाजल्यापासून जलआंदोलन सुरू केले जाईल. अनेक आंदोलनकर्ते नदीत बसून आंदोलन करणार आहेत. या आंदोलनास पर्यावरणप्रेमींनी उपस्थित राहावे, असे आवाहन मोपा विमानतळ पंचक्रोशी पीडित जनसंघटनेचे अध्यक्ष भारत बागकर, सरचिटणीस बया वरक यांनी पत्रकार परिषदेत केले.

बैलपार ही सरकारविरोधी लढाई नसून पेडणे तालुक्यातील शेतकऱ्यांच्या आणि सर्वसामान्य जनतेच्या अस्तित्वाची लढाई आहे. त्यामुळे

पेडणे येथील जनतेच्या जीवन मरणाची लढाई आहे, असे समजून लोकांनी आणि पर्यावरणप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून जलआंदोलन

यशस्वी करावे, असे आवाहन मोपा विमानतळ पंचक्रोशी पीडित जनसंघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT