Court Dainik Gomantak
गोवा

Anjuna Tourist Attacked : हणजूण येथील पर्यटक हल्ला प्रकरणी पाचही जणांना जामीन मंजूर

पर्यटक कुटुंबीयांवर हणजूण येथील एका रिसॉर्टच्या बाहेर स्थानिक युवकांनी सुरीने प्राणघातक हल्ला केल्याची घटना घडली होती.

गोमन्तक डिजिटल टीम

दिल्लीतील पर्यटक कुटुंबीयांवर हणजूण येथील एका रिसॉर्टच्या बाहेर स्थानिक युवकांनी सुरीने प्राणघातक हल्ला केल्याची घटना घडली होती. यात तिघेजण गंभीर जखमी होऊन हणजूण (Anjuna) पोलिसांनी किरकोळ हल्ल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता.

पीडितांनी घटनेचा व्हिडिओ व्हायरल (Viral Video) केल्यानंतर पोलिसांनी कलम 307 नुसार गुन्हा दाखल करून पाचव्या फरार आरोपीसह चौघांना अटक केली होती. दरम्यान या संबंधी मोठी अपडेट हाती येतेय. या पाचही आरोपींना सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे.

या प्रकरणी आमदार दिलायला लोबो यांनीही आपले मत मांडले होते. रिसॉर्टच्या कर्मचाऱ्यांची काहीही चूक नव्हती. पर्यटकांची अल्कोहोल टेस्ट करून त्यांच्यावर गुन्हा नोंद झाला पाहिजे. मुख्यमंत्री, पोलिस अधीक्षक यांना विनंती आहे. या प्रकरणात लक्ष घालावे, असेही आमदार दिलायला लोबो यांनी म्हटले होते.

काशिनाथ आगरवाडेकर, नायरॉन डायस, रॉयस्टन डायस, सलीम शेख जोसेफ अलेक्स लोबा अशी हणजूण येथील 'त्या' प्रकरणातील सहभागींची नावे असून पोलिसांनी सहा दिवसांनी कलम 307 नुसार गुन्हा दाखल करून अटक केली होती.

दरम्यान या प्रकरणी चुकीचा गुन्हा नोंद केलेल्या हणजूणचे पोलिस उपनिरीक्षक फ्रान्‍सिस्को झेविअर यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Porvorim Accident: पर्वरीत भरधाव दुचाकीची पादचाऱ्याला धडक; उपचारादरम्यान मृत्यू

Boeing 737 MAX विमानांना सॉफ्टवेअरचा 'धोका'; लँडिंगवेळी मार्गदर्शन प्रणाली बंद होण्याची शक्यता

El Nino Rabi Crops: 'एल निनो'चा रब्बीला मोठा फटका? केंद्रीय कृषी सचिवांचा इशारा; कोरडवाहू भागांसमोर संकट

ODI World Cup 2027 Schedule: क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! 2027 वनडे वर्ल्ड कपचं शेड्यूल 1 ऑक्टोबरला होणार जाहीर

Goa SIR: 'अल्पसंख्याकांना लक्ष्य केलेले नाही'; SIR वादावर मुख्यमंत्री सावंतांचा दावा, विरोधकांचे आरोप तथ्यहीन

SCROLL FOR NEXT