Bail denied to Shilpa Thapa, suspect in Kolhapur tourist robbery case in goa Dainik Gomantak
गोवा

Goa Crime News: कोल्हापूर पर्यटकांच्या लूटप्रकरणातील संशयित शिल्पा थापाला जामीन नामंजूर

जामीन दिला तर ती गायब होण्याची शक्यता नाकारता येत नाही असे निरीक्षण करत न्यायालयाने हा निर्णय दिला.

दैनिक गोमन्तक

पणजी: कोल्हापूर येथील काही पर्यटकांना म्हापसा येथील स्वादिष्ट जेवण देणारे हॉटेल दाखवण्याच्या बहाण्याने पार्लरमध्ये नेऊन त्याना लुटणाऱ्या टोळीमधील संशयित शिल्पा थापा हिला म्हापसा न्यायालयाने दुसऱ्यांदा जामीन फेटाळला. या टोळीने केलेला गुन्हा गंभीर स्वरुपाचा आहे तसेच त्यातील संशयित अजून फरारी आहेत. जामीन दिला तर ती गायब होण्याची शक्यता नाकारता येत नाही असे निरीक्षण करत न्यायालयाने हा निर्णय दिला.

(Bail denied to Shilpa Thapa, suspect in Kolhapur tourist robbery case in goa)

म्हापसा येथे मसाज पार्लर असलेल्या संशयितांनी कोल्हापूरच्या पर्यटकांना हॉटेलऐवजी पार्लरमध्ये नेऊन त्यांना मारहाण केली होती. त्यांच्याकडून खंडणी वसूल करताना त्यांच्याकडील सोन्याचे दागिने, रोख रक्कम, मोबाईल मिळून सुमारे १ लाख ८० हजारांचा ऐवज हिसकावून घेतला होता. तसेच याप्रकरणी तक्रार दिल्यास जीवे मारण्याची धमकी दिली होती. त्यामुळे हे पर्यटक गोव्यात पोलिसांत तक्रार न करता निघून गेले होते. कोल्‍हापूरला गेल्यावर झालेल्या घटनेची माहिती तेथील पोलिसांना दिल्यानंतर या प्रकरणाची गोवा पोलिसांकडून चौकशी सुरू झाली होती.

म्हापसा पोलिसांनी अटक केलेल्या सहा संशयितांविरुद्ध न्यायालयात आरोपपत्र सादर केल्यानंतर संशयित शिल्पा थापा हिने दुसऱ्यांदा जामिनासाठी अर्ज केला होता. तपाकाम पूर्ण झाले आहे तसेच संशयित न्यायालय ज्या सशर्त अटी घालील त्याचे पालन करण्यास तयार आहे अशी विनंती केली होती. मात्र सरकारी वकिलांनी या जामिनाला आक्षेप घेत संशयितांविरुद्ध असलेला गुन्हा गंभीर स्वरुपाचा आहे.

संशयित परप्रांतीय असून तिचा गोव्यातील पत्ता तात्पुरता आहे. त्यामुळे ती जामीन मिळाल्यावर गायब होण्याची शक्यता आहे अशी बाजू मांडली होती.

न्यायालयाने दोन्ही बाजू ऐकून घेतल्यानंतर या गुन्ह्यांची तीव्रता गंभीर स्वरुपाची आहे. या प्रकरणात कायद्यात संशयितांना जन्मठेपेची किंवा दहा वर्षाची कैदेची शिक्षा देण्याची तरतूद आहे. पोलिसांनी संशयितांविरुद्ध आरोपपत्र सादर केले असले तरी त्यांनी केलेला गुन्हा पाहता न्यायालय संशयिताला जामीन देऊ इच्छित नाही. त्यामुळे तिचा जामीन अर्ज फेटाळण्यात येत आहे आदेशात अतिरिक्त सत्र न्यायाधीश शर्मिला पाटील यांनी म्हटले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asia Cup Trophy Controversy: "आशिया कप ट्रॉफी दिली नाहीतर..." BCCI ॲक्शन मोडमध्ये! मोहसिन नक्वीला दिली 'वॉर्निंग'

Goa Tourism: 'बीच' म्हणजे खेळाचे मैदान नाही, पर्यटकाने वाढवली पोलिसांची डोकेदुखी; किनाऱ्यावर चारचाकी चालवल्याने गुन्हा दाखल!

आडवेळ्या पावसाक लागून मयाचे भात पिकावळीचेर हावळ; Watch Video

Goa News: गोवा फॉरवर्ड पक्षाच्या मुख्य कार्यालयात लक्ष्मी पूजन

Womens World Cup 2025: पराभवानंतरही संधी! भारतीय महिला संघ सेमीफायनलमध्ये कसा पोहोचणार? संपूर्ण गणित समजून घ्या

SCROLL FOR NEXT