Goa Tourist Latest News  Dainik Gomantak
गोवा

'त्या' प्रवाशांकडून सामानाचे पैसे आकारावे : गोवा फर्स्ट

स्थानिक कदंब बसमधून प्रवास करणाऱ्या बिगर गोमंतकीयांच्या सामानामुळे इतर प्रवाशांना त्रास सहन करावा लागतो.

दैनिक गोमन्तक

पणजी ते वास्को व परत असा प्रवास करणाऱ्या कदंब शटल व स्थानिक कदंब बसमधून प्रवास करणाऱ्या बिगर गोमंतकीयांच्या सामानामुळे इतर प्रवाशांना त्रास सहन करावा लागतो. या प्रवाशांकडून सामानाचे पैसे आकारण्यात यावे, अशी मागणी गोवा फर्स्ट या बिगर सरकारी संस्थेने कदंब महामंडळाकडे केली आहे.

गोव्यात येणारे परप्रांतीय मजूर तसेच पर्यटक आपल्या चार-पाच बॅग व इतर सामान घेऊन बस मधून प्रवास करतात. बसमध्ये चाढल्यानंतर ते आपले सामान वाटेवरच ठेवतात. त्यामुळे इतर प्रवाशांना मागच्या सीटवर जाण्यासाठी त्रास होतो.

याची दखल कंडक्टर घेत नसल्याने ते आपले सामान तसेच टाकतात. पर्यटक तसेच मजूर आपले वैयक्तिक 15 किलो ते 25 किलो पेक्षा जास्त वजनाचे सामान वाहून नेत असल्याने, दैनंदिन प्रवाशांना त्रास होतो. ज्यात कार्यालयात जाणारे कर्मचारी, रुग्ण, विद्यार्थी, वृद्ध आणि इतरांच्या समावेश असतो.

दरम्यान बहुतेक राज्य एका विशिष्ट वजनानंतर सामानाचे शुल्क आकारतात. ज्यामुळे येथील उत्पन्नात भर पडते. दरम्यान गोवा फर्स्ट या बिगर सरकारी संस्थेने कदंब महामंडळाने त्यांच्या कर्मचाऱ्यांना तातडीने सामान शुल्क आकारण्याचे निर्देश देण्यात यावे, अशी मागणी केली आहे. तसेच एवढे समान घेऊन बस प्रवास करणाऱ्या प्रवासांकडून सामानाचे भाडे का करत नाही ?याविषयी कर्मचाऱ्यांकडे चौकशी करावी, अशी मागणी केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sporting Club Goa: दीपांकुर शर्मा यांच्या खांद्यावर मोठी जबाबदारी; आय-लीग 2 मध्ये दमदार कामगिरीचे लक्ष्य

Goa Research: त्वचेच्या उपचारात 3D तंत्रज्ञानाची नवी झेप! स्वस्त आणि सुरक्षित जलजेल विकसित

Colvale Central Jail: कोलवाळ कारागृहात वाईननिर्मितीचा आरोप; प्रशासनाचा स्पष्ट इन्कार, 'सुरक्षा कडक केल्याने नाराजांचे षड्‌यंत्र'

Illegal Hill Cutting Case: 4 वर्षांच्या लढ्याला अखेर यश! हडफडेची बेकायदा कापलेली टेकडी पूर्ववत; हायकोर्टानं प्रकरण काढलं निकाली

Toxic Movie Release: 'टॉक्सिक'चा धमाका! रॉकस्टार यशची रुपेरी पडद्यावर धमाकेदार एन्ट्री; थिएटर्सबाहेर चाहत्यांची तोबा गर्दी VIDEO

SCROLL FOR NEXT