Goa Crime News Dainik Gomantak
गोवा

Baga Crime: सेंट क्रॉस कपेलाच्या मूर्तींची केली मोडतोड, नदीत दिल्या फेकून; मुंबईच्या एकाला अटक

Baga Creek: कपेल समितीचे अध्यक्ष रॉनी फर्नांडिस यांनी या घटनेची सोमवारी दुपारी हणजूण पोलिसांना माहिती दिली. त्यानुसार कारवाई करीत पोलिसांनी बत्रा याला बागा येथून त्याच्या राहत्या घरातून अटक केली.

Sameer Panditrao

कळंगुट: बागा येथील खाडी परिसरात पूर्वापार असलेल्या सेंट क्रॉसच्या कपेलातील वेलंकिणी सायबीण तसेच प्रभू येशू ख्रिस्ताच्या मूर्तींची मोडतोड करीत नदीत फेकून देण्यात आल्याच्या कारणावरून विवेक बलवंतराय बत्रा (५६, मूळ नरिमन पॉइंट, मुंबई) याला हणजूण पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. ही घटना सोमवारी (ता.२१) पहाटे घडल्याने परिसरातील ख्रिस्ती लोकांमध्ये संतापाची लाट पसरली.

दरम्यान, कपेल समितीचे अध्यक्ष रॉनी फर्नांडिस यांनी या घटनेची सोमवारी दुपारी हणजूण पोलिसांना माहिती दिली. त्यानुसार कारवाई करीत पोलिसांनी बत्रा याला बागा येथून त्याच्या राहत्या घरातून अटक केली. सध्या त्याला न्यायालयाकडून तीन दिवसांची पोलिस कोठडी फर्मावण्यात आली आहे. अधिक तपास सुरू आहे.

दरम्यान, याप्रकरणी आतापर्यंत तीन संशयितांना अटक करण्यात आली आहे. मुख्य संशयित विवेक बत्रा आणि त्याचे कामगार सहकारी विकास कुमार महातो (बिहार) तसेच माशुद मंडल (पश्चिम बंगाल) सध्या हणजूण पोलिसांच्या ताब्यात आहेत.

लोकांच्या धार्मिक भावना दुखावल्या जातील अशी कृत्ये करणाऱ्यांना कठोर शिक्षा होणे आवश्यक आहे. जेणेकरून ते पुन्हा असे गुन्हे करणार नाहीत. गोव्यात आरामात जीवन जगण्यासाठी हे लोक येतात आणि स्थानिक लोकांच्या धार्मिक भावनांना हेतुपुरस्सर दुखावतात. असे लोक मानसिक रोगी असतील तर त्यांना बांबोळीतील ‘आयपीबीएच’ इस्पितळात उपचारासाठी पाठवावे. त्यांना आमचा धार्मिक एकोपा बिघडवू देऊ नका.

मायकल लोबो, आमदार

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Health Horoscope: साप्ताहिक आरोग्य राशीभविष्य 21 ते 27 सप्टेंबर 2026; 'या' 3 राशींची प्रकृती राहील ठणठणीत, तर काहींना तणाव आणि थकवा सतावण्याची शक्यता

Mahindra Thar 3-Door Facelift: ऑफ-रोडिंगचा दम कायम, पण लूक मॉडर्न! थार येतेय नव्या अवतारात! Roxxची झलक पाहायला मिळणार

Foreign Woman Viral Video: फोटो काढत होती परदेशी महिला, अचानक लोकांनी घेरलं; पुढे जे घडलं ते कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडिओ

क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! Asian Games 2026 मध्ये IND vs PAK महामुकाबला होणार नाही; भारताची श्रीलंकेशी फायनलमध्ये लढत

Low BPची समस्या वारंवार होतेय? चक्कर, थकवा अन् मळमळकडे दुर्लक्ष करू नका; जाणून घ्या लक्षणे आणि उपाय

SCROLL FOR NEXT