Goa bag theft case Dainik Gomantak
गोवा

Goa Crime: आधी बॅग हिसकावली, मग थुंकला; विकृत चोराला अटक

Bag snatching Goa: बॅग हिसकावून घेत अंगावर थुंकत सराईतपणे पसार झालेल्या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे

Akshata Chhatre

मडगाव: मुगाळीतील रामनगरी जंक्शनवर एका माणसाकडून बॅग हिसकावून घेत, त्याच्या अंगावर थुंकत सराईतपणे पसार झालेल्या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे आणि निवाड्यात मडगाव न्यायालायने त्याला ९० दिवसांची शिक्षा ठोठावली आहे.

आरोपी आगुस्तिन कार्व्हालो याने मुगाळी भागातील भगवती कॉलनीनजीक रामनगरी जंक्शनवर ही चोरी केली होती. हा एकूण प्रकार २४ जून २०२४च्या दिवशी घडला होता. तक्रारदार रामनगरी जंक्शनवर थांबला असता आरोपीने प्रकाश निदोनीच्या हातातील बॅग हिसकावून घेत, त्याच्या अंगावर थुंकत पळ काढला होता.

या बॅगमध्ये एकूण ४० हजार रुपये होते. तक्रारदार प्रकाश निदोनी यांनी स्थानिक पोलीस स्थानकात तक्रार नोंदवली असता आरोपीच्या विरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

गुन्ह्याची नोंद झाल्यानंतर मडगाव पोलीस उपअधीक्षक यांच्यासह मायना कुडतरी पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संकेत नाईक हे या प्रकरणाचा शोध घेत होते.

पोलिसांना मिलेल्या माहितीनुसार आरोपी आगुस्तिन कार्व्हालो हा एक अट्टल चोर आहे आणि त्यांच्या विरुद्ध यापूर्वी २० गुन्हे नोंद झाले आहेत तर २५ प्रकरणांत त्याला अटक देखील झालीये. चोरी किंवा सोन्याच्या साखळ्या लुबाडण्याचे गुन्हे त्याच्या नावे नोंद झालेत, त्याला यापूर्वी मडगावमधून हद्दपार देखील करण्यात आलं होतं.

या नवीन प्रकरणात त्याने स्वतः चोरीची कबुली दिली आहे आणि जबरदस्ती तसेच चोरी केल्याप्रकरणी न्यायालयाने त्याला ९० दिवसांची कोठडी सुनावलीये, तसेच त्याने याआधी भोगलेल्या कारावासाचा अवधी कमी करण्याचे न्यायालयीन आदेशात नमूद करण्यात आले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Sport: 'स्पोर्टिंग'च्या नवोदितांकडे सर्वांच्या नजरा! चॅरिटी कपमधून गोवा फुटबॉल असोसिएशनच्या नव्या मोसमाला सुरुवात; धेंपोविरुद्ध रंगणार थरारक लढत

Goa Women Cricket: पूजा, अथश्री, निखिलाची लक्षवेधी कामगिरी! गोव्याच्या मुलींनी हिमाचल प्रदेशला 18 धावांनी नमवले; स्पर्धेतील दुसरा विजय

Allahabad High Court: 'कोठडीत आरोपीला मारहाण करणं पोलिसांची ऑफिशियल ड्युटी नाही'! हायकोर्टानं यूपी पोलिसांना फटकारलं; काय नेमकं प्रकरण?

Goa ST Reservation: जनगणनेनंतरच गोव्यात 'एसटी' आरक्षण शक्य! मायकल लोबोंचा दावा; अद्ययावत आकडेवारीशिवाय आरक्षणाला न्यायालयीन आव्हानाची शक्यता

Bardez Development: बार्देशच्या कायापालटाचा निर्धार! मायकल लोबोंकडून प्रलंबित विकासकामांना गती; रस्ते, पूल, आरोग्य केंद्रांवर विशेष भर

SCROLL FOR NEXT