Bad Roads in Goa Dainik Gomantak
गोवा

धावे सत्तरीत अंतर्गत रस्ते खड्डेमय

Bad Roads in Goa : डांबर गेले वाहून ; पावसाळ्यात भेडसावणार मोठी समस्या

दैनिक गोमन्तक

वाळपई : सत्तरी तालुक्यात ग्रामीण भागात आजही साधन सुविधांची वानवा आहे. काही गावात अजूनही रस्त्यांची दुरुस्ती झालेली नाही. नगरगाव पंचायत क्षेत्रातील धावे गावातील मारुती मंदिराकडे व लोकवस्तीत जाणारा अंतर्गत रस्ता अतिशय खराब झालेला आहे. त्यामुळे नागरिकांना वाहन चालविण्यास अत्यंत त्रासदायक ठरत आहे.

रस्त्याची दुरावस्था झाल्याने पावसाळ्यात वाहनचालकांना मोठ्या समस्येला तोंड द्यावे लागणार आहे. रस्त्यावरील डांबर पूर्णतः गेल्याने खड्ड्यातूनच चालकांना वाट काढावी लागत आहे. धावेतील नागरिक संदेश गाडगीळ यांनी याबाबत संताप व्यक्त केला आहे. धावे गावातील इतर ठिकाणच्या वाड्यावर रस्ते डांबरीकरण करण्यात आलेले आहेत. मात्र, मारुती मंदिर व लोकवस्तीत जाणाऱ्या रस्त्याकडे दुर्लक्षच केल्याने त्यांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.

भाजपलाच मताधिक्य; तरीही..!

आतापर्यंतच्या निवडणूक इतिहासात धावे गावात प्रत्येकवेळी भाजपलाच अधिक मताधिक्य मिळाले आहे. विशेष म्हणजे या वाड्यावरील बहुतांश मतदार नागरिक हे भाजप समर्थक आहेत. अगदी आरोग्यमंत्री काँग्रेसमध्ये असताना देखील धावे गावात पंचायत निवडणूक, विधानसभा, जिल्हा पंचायत निवडणुकीत भाजपलाच आघाडी मिळत आलेली आहे. आता तर खुद्द राणेच भाजपमध्ये असल्याने धावे गावात प्रचंड आघाडी मिळाली होती. तरीही येथील रस्त्याचे डांबरीकरण होत नसल्याने लोकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT