Mapusa potholes on road  Dainik Gomantak
गोवा

Mapusa Road: रस्त्यांवर खड्डे की खड्ड्यात रस्ते? म्हापसेकरांची तारेवरची कसरत

Goa Road: वाहनचालक त्रस्त, वीज वाहिन्यांसाठी खोदलेल्या रस्त्यांची स्थिती गंभीर

गोमन्तक डिजिटल टीम

म्हापसा शहरातील रस्त्यांची स्थिती अत्यंत दयनीय बनली आहे. परिणामी पादचारी व वाहन चालकांचे प्रचंड हाल होत आहेत. पावसात रस्त्यांवरील खड्डे चुकविताना पादचारी व वाहन चालकांना तारेवरची कसरत करावी लागते. विशेषतः भूमिगत वीज वाहिन्यांसाठी खोदलेल्या रस्त्यांची स्थिती फारच गंभीर आहे.

खोर्ली भागातील रस्त्यांची डागडुजी तुलनेने ठीक आहे, मात्र आंगोड, गावसावाडा व पेडेमधील बहुतांश रस्त्यांची दैना झाली आहे. रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडले असून नीट चालता येत नाही. गावसावाडा येथील स्थिती जास्त गंभीर आहे, कारण भूमिगत वीज वाहिन्यांचे काम तसेच मलनिस्सारण कामासाठी खोदलेले रस्ते दुरुस्त करण्यात आलेले नाहीत.

पावसाच्या तोंडावर डांबरीकरण...

काही ठिकाणी पावसापूर्वी गडबडीत व पाऊस तोंडावर आलेला असताना रस्त्यांना डांबरीकरणाचा मुलामा चढविण्यात आला होता, पावसात ते डांबर वाहून गेले आहे. त्यामुळे रस्ते खड्डेमय झाले आहेत.

गटार व्यवस्थेचे तीनतेरा...

गटार व्यवस्थेचे तीनतेरा वाजल्याने रस्त्यांवरील पावसाच्या पाण्याचा योग्यरीत्या निचरा होत नाही, परिणामी खड्यांचा अंदाज वाहनचालकांना येत नाही. त्यामुळे लहान मोठे अपघात विशेषतः रात्रीच्या वेळी नित्याचेच बनेलत. शहरातील मुख्य रस्त्यांची जर अशा प्रकारे दुरवस्था असेल तर अन्य भागातील रस्त्यांबाबत न बोललेच बरे, अशी संतप्त प्रतिक्रिया स्थानिक सीतेश मोरे यांनी दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT