Ganesh Idol|Goa Bad Roads Canva
गोवा

Curchorem Roads: कंत्राटदार बदलले तरी खड्डे तसेच! चतुर्थीपूर्वी खड्डे बुजवण्याच्या घोषणेचे काय झाले?

Curchorem: कुडचडेतील रस्त्यांची अक्षरश: चाळण झाली आहे; चतुर्थीपूर्वी येथील रस्त्यांची डागडुजी करणे आवश्यक होते

गोमन्तक डिजिटल टीम

कुडचडे:  रस्त्यांवरील खड्डे चतुर्थीपूर्वी बुजविण्याची मागणी कुडचडेतील लोक करीत आहेत, तर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनीही चतुर्थीपूर्वी सर्व खड्डे बुजविण्यात येतील, असे सांगितले असतानाच बाप्पा घरी आले तरी खड्डे जशास तसे असल्यामुळे नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

काही भाविकांनी चतुर्थीपूर्वी एक दिवस आधी (शुक्रवारी) गणेशमूर्ती घरी आणल्या. काहीजण उद्या (शनिवारी) आणणार आहेत. अशा खड्डेमय रस्त्यावरून दुचाकी सोडाच, चारचाकीमधूनही गणेशमूर्ती घरी कशी आणावी, याची चिंता भाविकांना लागून राहिली आहे. कारण कुडचडेतील रस्त्यांची अक्षरश: चाळण झाली आहे. येथील रस्त्यांची चतुर्थीपूर्वी डागडुजी करणे आवश्यक होते.

पाऊस अधिक पडत असल्यामुळे रस्ता दुरुस्ती करणे शक्य झाले नसले, तरी पावसाने उघडीप दिल्यावर खड्डे बुजविणे शक्य होते. मात्र, डांबरीकरण सोडाच, खड्डेही न बुजविल्यामुळे लोकांना शारीरिक त्रास सहन करावे लागत असून वाहनेही खिळखिळी होत आहेत.

कंत्राटदार बदलतात, स्थिती तीच

पुष्कल सावंत म्हणाले की, विकास हवा म्हणून किती काळ जनतेने दुःख सहन करावे, हा प्रश्न आहे. कामे पूर्ण होत नाहीत. फक्त कंत्राटदार बदलत आहेत. परत परत त्याच ठिकाणी खड्डे पडतात. जनतेला त्रास देण्याचे कंत्राट सार्वजनिक बांधकाम खात्याने घेतले आहे की काय? आता पावसाचे निमित्त पुढे करून चालणार नाही. सरकारने व्यवस्थित नियोजन करून खड्डे बुजवावेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT