मडगाव-कारवार हमरस्त्याच्या गुळे येथे हॉटमिक्स डांबरीकरणाचा शुभारंभ करताना बुदवंत व गावकरी. Dainik Gomantak
गोवा

अखेर गुळे येथे खड्डे बुजविण्याच्या कामाला सुरुवात

1 मार्च पूर्वी डांबरीकरणास सुरूवात न केल्यास रास्ता रोको करण्याचा इशारा त्यांनी दिला होता.

दैनिक गोमन्तक

काणकोण: हॉटमिक्स डांबरीकरणास प्रारंभ करण्यात आला आहे.सद्या या रस्त्याचा डांबर उखडला असून ठिकठिकाणी खड्डे पडले आहे. पोळे तपासणी नाका ते दापट पर्यत हॉटमिक्स डांबरीकरण चार महिन्यापूर्वीच करण्यात आले होते. मात्र त्यानंतर अवकाळी पाऊस झाल्याने कंत्राटदाराने डांबरीकरण थांबविले. मात्र त्यानंतर मागणी करूनही कंत्राटदाराने डांबरीकरणाला सुरूवात केली नाही. (Bad road conditions in canacona)

त्यासाठी दोन दिवसांपूर्वी कॉंग्रेसचे (Goa Congress) जनार्दन भंडारी व गोवा फॉरवर्ड (Goa Forward) पक्षाचे प्रशांत नाईक, विकास भगत व अन्य कार्यकर्त्यांनी सार्वजनिक बांधकाम खात्याचे कार्यकारी अभियंता दत्तप्रसाद कामत यांची भेट घेऊन मडगाव-कारवार हमरस्त्याच्या धर्मापूर ते पोळे पर्यंतच्या रस्त्याचे प्रलंबित असलेले डांबरीकरण त्वरीत सुरू करावे अशी मागणी केली होती. डांबरीकरणाच्या कामाची वर्कऑर्डर कंत्राटदार कोटारी यांना ऑक्टोबर महिन्यात देण्यात आली होती. त्याला स्मरण पत्र पाठवून ही त्याने डांबरीकरणास आरंभ केला नसल्याचे अभियंता कामत यांनी शिष्टमंडळाला सांगितले. यावेळी जनार्दन भंडारी यांनी काणकोण (Canacona) ते बाळ्ळी पर्यंतचा रस्ता उखडला आहे. 1 मार्च पूर्वी डांबरीकरणास सुरूवात न केल्यास रास्ता रोको करण्याचा इशारा त्यांनी दिला होता. त्याप्रमाणे कंत्राटदाराने गुळे येथे मंगळवारी खड्डे बुजविण्याच्या कामाला सुरुवात केली. यावेळी कॉंग्रेस चे जनार्दन भंडारी,गोवा फॉरवर्डचे विकास भगत व अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India vs Pakistan: ODI World Cup 2027 मध्ये भारत-पाकिस्तान 3 वेळा भिडणार? 'ICC' च्या नव्या फॉरमॅटने वाढवली उत्सुकता

Goa Weather Update: मुसळधार पावसानंतर राज्यात दिलासादायक चित्र; पावसाचा जोर ओसरला, शेतकरी हवालदील

Noida Fire: नोएडातील पाच मजली इमारतीला भीषण आग; दोन जणांचा मृत्यू, अनेकजण अडकल्याची भीती; बचावकार्य सुरू

Rohit Sharma Viral Video: रोहित शर्माचा आक्रमक अवतार? भर मैदानात 'या' खेळाडूला मारली लाथ, कॅमेऱ्यामागे नेमकं काय घडलं? व्हिडिओ व्हायरल

8th Pay Commission: HRA मध्ये अपेक्षेपेक्षा मोठी वाढ होण्याची शक्यता; फिटमेंट फॅक्टर ठरणार निर्णायक, पाहा संपूर्ण गणित

SCROLL FOR NEXT