Babush Monserrate Dainik Gomantak
गोवा

37th National Games 2023: राष्‍ट्रीय क्रीडा स्‍पर्धेत तपास अधिकारी व्‍यस्‍त बाबूश मोन्‍सेरात खटला तहकूब

37th National Games 2023: बाबूश खटला तहकूब : गुदिन्‍हो प्रकरणही पुढे

दैनिक गोमन्तक

Babush Monserrate: महसूलमंत्री बाबूश मोन्‍सेरात यांचा कथित सहभाग असलेल्‍या पणजी पोलिस स्‍थानक हल्‍ला प्रकरणातील तपास अधिकारी असलेले पणजीचे पोलिस उपअधीक्षक सुदेश नाईक हे सध्‍या गोव्‍यात चालू असलेल्‍या ३७व्‍या राष्‍ट्रीय क्रीडा स्‍पर्धेतील बंदोबस्‍त ड्युटीत व्‍यस्त असल्‍याने शुक्रवारी (ता.२७) मडगाव न्‍यायालयात ते साक्ष देण्‍यासाठी उपस्थित राहू शकले नाहीत.

त्‍यामुळे खास न्‍यायालयाचे न्‍यायाधीश इर्शाद आगा यांनी ही सुनावणी 24 नोव्‍हेंबरपर्यंत तहकूब केली.

2008 साली बाबूश मोन्‍सेरात आणि त्‍यांच्‍या समर्थकांनी पणजी पोलिस स्‍थानकावर हल्‍ला करून या पोलिस स्‍थानकाची मोडतोड केल्‍याचा आरोप आहे. हा खटला सध्‍या न्‍या. आगा यांच्‍यासमोर चालू आहे.

दरम्‍यान, 1998 च्‍या वीज बिल घोटाळ्‍यातील संशयित असलेले पंचायतमंत्री माविन गुदिन्‍हो यांच्‍याविरुद्धच्‍या खटल्‍याची सुनावणी 22 नोव्‍हेंबरपर्यंत पुढे ढकलण्‍यात आली.

या खटल्‍यातील तपास अधिकारी शेरीफ जॅकीस हेही राष्‍ट्रीय क्रीडा स्‍पर्धांच्‍या बंदोबस्‍तात गर्क असल्‍याने तेही शुक्रवारी न्‍यायालयात उपस्‍थित राहू शकले नाहीत. या प्रकरणात न्‍या. आगा यांनी 16 साक्षीदारांना न्‍यायालयात साक्षीसाठी हजर राहण्‍यासाठी समन्‍स जारी केले आहे.

1998 साली काँग्रेस सरकारात वीजमंत्री असताना गुदिन्‍हाे यांनी आपल्‍या मर्जीतील काही उद्योजकांना वीज बिलांत सवलत देऊन 4.50 कोटी रुपयांचे राज्‍य सरकारचे नुकसान केल्‍याचा आरोप आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Iran: इराणच्या रिव्होल्यूशनरी गार्ड्सची मोठी कारवाई! 5 पोलिसांच्या हत्येचा बदला घेत 13 दहशतवाद्यांचा केला खात्मा VIDEO

Monthly Horoscope September 2025: सप्टेंबरमध्ये 'या' 5 राशींचे भाग्य उजळणार! ‘भद्र राजयोग’ देणार सुख-समृद्धी; धन-संपत्तीत होणार मोठी वाढ

Velsao Gram Sabha: वेळसाव ग्रामसभेचा मोठा निर्णय! मेगा प्रकल्पांच्या बांधकामावर बंदी; 'कचरा, पाणी आणि रस्त्यांची भेडसावतेय समस्या

Data Protection Law: चिंता मिटली! खरेदी करताना नाही द्यावा लागणार मोबाईल नंबर, ग्राहकांच्या गोपनीयतेसाठी सरकार आणतयं नवा कायदा

Kabul Bus Accident: काबूलमध्ये भीषण अपघात, प्रवासी बस उलटून 25 जणांचा मृत्यू; 27 जखमी

SCROLL FOR NEXT