Babush Monserratte

 
Dainik Gomantak
गोवा

सत्तरीप्रमाणेच पणजीतही नोकऱ्यांची खैरात करा

बाबूशचा पणजीतील भाजपच्या सभेत मुख्यमंत्र्यांना सल्ला

दैनिक गोमन्तक

पणजी : पणजीतील आमदार या नात्याने बेरोजगार तरुणांना रोजगार देण्याचे माझे कर्तव्य आहे. जशी सत्तरीमध्ये नोकऱ्यांची खैरात केली जाते तशी काही प्रमाणात पणजीकडेही मुख्यमंत्र्यांनी लक्ष द्यावे. सर्व सरकारी कार्यालये ही पणजीत आहेत म्हणून पणजी मतदारसंघालाही न्याय मिळायला हवा अशा कानपिचक्या पणजीचे आमदार बाबूश मोन्सेरात यांनी पणजीत भाजपच्या जाहीर मेळाव्यात मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत दिल्या.

पणजी भाजप मंडळाच्या जाहीर सभेला व्यासपीठावर मुख्यमंत्री प्रमोद सावंत, प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे, उपमुख्यमंत्री बाबू कवळेकर, पणजीचे आमदार बाबुश मोन्सेरात, महाराष्‍ट्राचे नेते निरंजन डावखुरे, महापौर रोहित मोन्सेरात व इतर भाजप नेते उपस्थित होते. या कार्यक्रमाला गोवा प्रभारी देवेंद्र फडणवीस हे अनुपस्थित राहिले. या सभेला भाजप कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती.

गेल्या दहा वर्षात भाजप सरकारने गोव्याला (Goa) समृद्धीच्या दिशेने नेण्याचे काम केले आहे. भाजप सत्तेवर आल्यापासून गोव्यात विकासाची गंगा सुरू झाली. त्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गोव्यासाठी मोठे प्रकल्प देताना निधीही दिला त्यामुळे हे शक्य झाल्याचे मुख्यमंत्री डॉ. सावंत म्हणाले.

तीन ठिकाणी जिंकणारे मोन्सेरात एकमेव आमदार

पणजीतही माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी जी कामे हाती घेतली होती ती पुढे नेण्याचे काम आमदार बाबुश मोन्सेरात (Babush Monserratte) हे करत आहेत. तीन मतदारसंघात उभे राहून विजयी होणारे मोन्सेरात हे एकमेव गोव्यातील आमदार आहेत, असे मुख्यमंत्री प्रमोद सावंत म्हणाले.

भाजपने (BJP) निवडणुकीची तयारी म्हणून राज्यात जाहीर सभा सुरू केल्या आहेत. त्याला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद लाभत आहे यावरून पुढील सरकार हे पुन्हा भाजपचे आणण्याचे लोकांनी निश्‍चय केला आहे सिद्ध होते. सरकारने गेल्या दहा वर्षात केलेल्या विकासाचे प्रगती कार्ड लोकांसमोर ठेवण्यात आले आहे. पणजीचे आमदार हे कमी बोलतात.

मात्र, लोकांमध्ये अधिक मिसळतात. त्यांची सुखदुःखे जाणून घेत असल्याने त्यांच्यावर लोकांचे प्रेम व विश्‍वास आहे. त्यांच्या कामाचा धडाका वाखणण्याजोगा आहे. त्यामुळे पणजी मतदारसंघात पुन्हा भाजपचेच वर्चस्व असेल याबाबत कोणतीही शंका नाही, असे यावेळी प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे (Sadanand Shet Tanavade) म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

England Cricket Team: इंग्लंड क्रिकेटमध्ये मोठी उलथापालथ! स्टीफन फ्लेमिंग यांची प्रशिक्षकपदी वर्णी, जो रूटवर पुन्हा नेतृत्वाची जबाबदारी

Flight Viral Video: विमानात पॉवर बँकला अचानक आग; प्रवाशांमध्ये एकच गोंधळ, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

WWE News: 'SummerSlam 2026'पूर्वी WWE ला मोठा धक्का! 'मानधन अपेक्षेपेक्षा कमी मिळायचं' म्हणत स्टार रेसलरने ठोकला रामराम

Ramayana Trailer Reaction: 'रामायण: पार्ट 1'च्या ट्रेलरची चर्चा! रणबीरचं तेजस्वी रूप अन् यशचा रौद्र अवतार, चाहते मात्र नाराज; म्हणाले, 'हनुमान कुठे?'

Cutbona Jetty Fishing Season: कुटबण जेटीवर नव्या मासेमारी हंगामाची लगबग; हवामान, मजूर टंचाईची मच्छीमारांनी चिंता व्यक्त केली

SCROLL FOR NEXT