Babush Monserrate Santa Cruz Office Dainik Gomantak
गोवा

Babush Monserrate Santa Cruz Office: सांताक्रूझमध्ये उभारणार मोन्सेरातांचे नवे कार्यालय; भाजपचा उमेदवार निवडून आणण्याचे ध्येय

Santa Cruz BJP Candidate: महसूलमंत्री बाबूश मोन्सेरात पुन्हा सांताक्रूझमधील आपले कार्यालय सुरू करणार आहेत.

दैनिक गोमन्तक डिजिटल

पणजी: महसूलमंत्री बाबूश मोन्सेरात पुन्हा सांताक्रूझमधील आपले कार्यालय सुरू करणार आहेत. तेथून आगामी निवडणुकीत भाजपचाच उमेदवार विजयी होईल, असे सांगत त्यांनी उत्सुकता वाढवली आहे.

कार्यालयातील कामाची बाबूश यांनी शुक्रवारी (ता.३१) पाहणी केली. त्यावेळी सांताक्रूझमधून निवडणूक लढवण्याचा विचार आहे का? अशी थेट विचारणा पत्रकारांनी केली असता त्यांनी सरळ उत्तर देणे टाळले. उमेदवारी हा पक्षाचा विषय आहे. मी केवळ भाजपचा कार्यकर्ता आहे.

सांताक्रूझमधून भाजपचा उमेदवार निवडून आणणे, ही माझी त्या नात्याने जबाबदारी ठरते, असे ते म्हणाले. सांतक्रूझचा मी माजी आमदार आहे. त्यामुळे अनेकांशी माझा संपर्क आहे. त्यांची कामे सुलभपणे व्हावी यासाठी कार्यालय असावे, अशी त्यांची मागणी आहे.

शिवाय तिसवाडीमध्ये मी केवळ एकमेव मंत्री आहे. त्यामुळेही सांताक्रूझला कार्यालय असावे, असे मला वाटले म्हणून कार्यालय सुरू करण्याचा निर्णय घेतला. नजीकच्या काळात ते पूर्ण क्षमतेने सुरू केले जाईल, असे बाबूश यांनी सांगितले.

माझे रुडॉल्फशी वितुष्ट नाही!

सांताक्रूझमध्ये सध्या भाजपचे रुडॉल्फ फर्नांडिस आमदार आहेत, याकडे लक्ष वेधले असता बाबूश म्हणाले, माझे त्यांच्याशी वितुष्ट नाही. तेही भाजपचे काम करतात, मीही भाजपच्या कामासाठीच कार्यालय सुरू करत आहे. विधानसभा निवडणुकीत उमेदवारी कोणाला द्यावी, हा पक्षाचा निर्णय असतो. उमेदवाराला निवडणून आणणे, हे आम्हा सर्वांचे काम असते. सांताक्रूझमधून भाजपचा आमदार निवडून आणण्यासाठीच हे सारे प्रयत्न आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India Nuclear Weapons Report 2026: भारताच्या अण्वस्त्रांबाबत अमेरिकन संस्थेचा मोठा दावा! भारतीय शस्त्रागारात 190 अण्वस्त्रे, क्षेपणास्त्रांचे वेगाने आधुनिकीकरण सुरु

Duleep Trophy Winner 2026: 13 वर्षांनंतर चॅम्पियनशिपचा महासंग्राम जिंकला! ईस्ट झोनने जिंकली दुलीप ट्रॉफी; ईशान किशन ठरला विजयाचा 'हिरो' VIDEO

Canacona Coarse Farming: पावसाने ऐन पेरणीच्या काळात दिला दगा; काणकोणातील भरड शेतीला मोठा फटका, 2520 हेक्टरपैकी मोठ्या क्षेत्रावर पेरणीच नाही

Goa Politics: 'गोवा फर्स्ट' 2027चा नवा राजकीय पर्याय ठरणार? सरदेसाईंचे संकेत; काँग्रेससोबतची युतीची बोलणी सध्या स्थगित

Houthi Missile Attack Saudi Arabia: हुतींच्या सौदीवरील हल्ल्याने बिथरला पाकिस्तान, इराणला दिली तंबी; मुस्लीम जगतात खळबळ

SCROLL FOR NEXT