Goa Politics Dainik Gomantak
गोवा

Goa Politics: 'पणजीतूनच निवडणूक लढवणार, भाजपमध्येच राहणार'; उत्पल पर्रीकरांच्या संभाव्य घरवापसीवर बाबूश यांची स्पष्ट भूमिका

Goa Assembly Elections 2027: उत्‍पल पर्रीकर पुन्‍हा भाजपमध्ये प्रवेश करणार असून विधानसभा निवडणुकीत पणजीची उमेदवारी उत्‍पलना मिळण्‍याच्‍या चर्चेने जोर धरलेला असतानाच, ‘‘उत्‍पल यांचे भाजपमध्ये स्‍वागतच आहे.

गोमंतक ऑनलाईन टीम

पणजी: उत्‍पल पर्रीकर पुन्‍हा भाजपमध्ये प्रवेश करणार असून विधानसभा निवडणुकीत पणजीची उमेदवारी उत्‍पलना मिळण्‍याच्‍या चर्चेने जोर धरलेला असतानाच, ‘‘उत्‍पल यांचे भाजपमध्ये स्‍वागतच आहे. पण, मी भाजपमध्येच राहणार आणि विधानसभा निवडणूक पणजीतून लढवणार’’, असे मंत्री तथा पणजीचे आमदार बाबूश मोन्‍सेरात यांनी प्रसिद्धी माध्यमांना सांगितले.

विधानसभा निवडणूक आणि भाजपाध्‍यक्ष नितीन नवीन यांच्‍या उपस्‍थितीत येत्‍या मंगळवारी होणाऱ्या प्रदेश कार्यकारिणी बैठकीचा आढावा घेण्‍यासाठी गोव्‍यात आलेले भाजपचे संयुक्त राष्‍ट्रीय सरचिटणीस शिवप्रकाश यांनी शुक्रवारी माजी मुख्‍यमंत्री लक्ष्‍मीकांत पार्सेकर आणि उत्‍पल पर्रीकर यांची भेट घेऊन त्‍यांच्‍याशी चर्चा केली. त्‍यानंतर गत विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपचा त्‍याग केलेले हे दोन्‍ही नेते पुन्‍हा भाजपमध्ये प्रवेश करण्‍याच्‍या चर्चा सुरू झाल्‍या.

तसे स्‍पष्‍ट संकेत पार्सेकरांनीही दिले. पण, उत्‍पल भाजपमध्ये परतल्‍यास आणि पक्षाने विधानसभा निवडणुकीत पणजीची उमेदवारी त्‍यांना दिल्‍यास बाबूश कोणता पर्याय स्‍वीकारणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. या पार्श्वभूमीवर बाबूश म्हणाले, ‘‘राज्‍यात भारतीय जनता पक्ष बळकट करण्‍यात माजी मुख्‍यमंत्री स्‍व. मनोहर पर्रीकर यांचे मोठे योगदान आहे. त्‍यांनीच मला भाजपमध्ये घेतले. माझ्‍या भाजप प्रवेशामुळे उत्‍पल यांनी पक्ष सोडला, असे म्‍हणता येणार नाही. किंबहुना त्‍याची कारणे मला माहीत नाहीत.

आता उत्‍पल पुन्‍हा भाजपमध्ये येत असतील तर त्‍यांचे स्‍वागतच आहे. परंतु, विधानसभा निवडणूक मी पणजीतूनच लढणार आहे. इतर मतदारसंघात जा, असे मला कुणीही सांगण्‍याची गरज नाही’’, असे बाबूश यांनी निक्षून सांगितले. ‘‘लक्ष्‍मीकांत पार्सेकर, उत्‍पल पर्रीकर असे पक्ष सोडून गेलेले नेते पुन्‍हा परतत असतील तर ती चांगलीच गोष्‍ट आहे. अशा नेत्‍यांच्‍या प्रवेशामुळे पक्षाला आणखी बळकटी मिळेल’’, असे ते म्हणाले.

रोहितची उमेदवारी पक्षच ठरवेल

रोहित मोन्‍सेरात यांची उत्तर गोवा नियोजन आणि विकास प्राधिकरणाच्या अध्‍यक्षपदी नेमणूक केल्‍याबद्दल मी पक्षाचे आभार मानतो. रोहितला ताळगावातून उमेदवारी देण्‍याचा निर्णय पक्षच घेईल. गेली सहा वर्षे पणजीचे महापौर या नात्‍याने त्‍याने चांगले काम केले आहे’’, असेही बाबूश म्‍हणाले.

‘युगोडेपा’ प्रवेशाचा केला इन्कार

अवघ्‍या चार महिन्‍यांवर येऊन ठेपलेल्‍या विधानसभा निवडणुकीत ‘युगोडेपा’ही उतरणार असून, बाबूश मोन्‍सेरात ‘युगोडेपा’तूनही लढू शकतात, अशी चर्चा राज्‍यात सुरू आहे. परंतु, ‘‘मी दुसऱ्या कोणत्‍याही पक्षात जाण्‍याचा विचार केलेला नाही. मी भाजपमध्ये असून, शेवटपर्यंत भाजपसोबतच राहणार’’, असे बाबूश यांनी स्‍पष्‍ट केले. ‘‘पणजीतील जनतेला हवा तसा विकास मी करत आहे. महापालिकेकडूनही दर्जेदार कामे सुरू आहेत. त्‍यामुळे पणजीवासीय माझ्‍या तसेच ‘मनपा’च्‍या कामावर समाधानी आहे’’, असेही बाबूश यांनी स्पष्ट केले.

सांताक्रूझ : मिळून निर्णय घेऊ

‘‘सांताक्रूझ मतदारसंघ यावेळी निश्‍चितपणे भाजपला मिळेल. त्‍यासाठी लवकरात लवकर उमेदवाराची निवड करून काम सुरू करावे लागेल, असे मी पक्षाला सांगितले होते. त्‍यानंतर मी तेथे कार्यालय सुरू करण्‍याचा निर्णय घेतला. पण कार्यालय स्‍थापन करण्‍यास पक्षाने मला सांगितले नव्‍हते. सांताक्रूझसंदर्भात आम्‍ही मिळून योग्‍य तो निर्णय घेऊ’’, असे मोन्‍सेरात म्‍हणाले. ‘‘ताळगावमध्ये विरोधकांनी माझा पराभव करण्‍याचा प्रयत्‍न केला. पण, ते शक्‍य झाले नाही. पण मी भाजपमध्ये आल्‍यानंतर ताळगाव मतदारसंघ भाजपकडे आला. त्‍याचपद्धतीने आता सांताक्रूझही भाजपला मिळेल.’’

स्‍मार्ट सिटीच्‍या कामांवर असमाधान : ‘‘स्‍मार्ट सिटी प्रकल्‍पांतर्गत पणजीत दर्जात्‍मक कामे झालेली नाहीत. त्‍यामुळे स्‍मार्ट सिटीच्‍या कामांबाबत मी अजूनही असमाधानीच आहे’’, असे बाबूश म्‍हणाले. ‘‘माजी मुख्‍यमंत्री स्‍व. मनोहर पर्रीकर, सिद्धार्थ कुंकळ्येकर यांच्‍या काळात स्‍मार्ट सिटीच्‍या निविदा मंजूर झाल्‍या होत्‍या. त्‍यामुळे त्‍याबाबत मी काही बोलू शकत नाही’’, असेही त्‍यांनी नमूद केले.

भाजपाध्यक्षांना भेटणार उत्पल

येत्या २७ रोजी राज्याच्या दौऱ्यावर येणारे भाजपाध्यक्ष नितीन नवीन यांची उत्पल भेट घेणार आहेत. त्यांचा भाजप पक्ष प्रवेशाचा निर्णय अद्याप झालेला नाही. मी पक्षाच्या राष्ट्रीय सचिवांची (संघटन) औपचारिक भेट घेतली. या भेटीत फारशी चर्चा झाली नसल्याचे त्यांनी सांगितले आहे. त्यामुळे बाबूश यांच्या या पवित्र्यानंतर उत्पल काय करतात, याकडे सर्वांच्या नजरा आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs NZ T20I Series: भारत-न्यूझीलंड मालिकेदरम्यान मोठी बातमी! स्टार वेगवान गोलंदाज मालिकेतून बाहेर, कोणाला मिळणार संधी?

Horoscope: कोजागरी पौर्णिमेला चमकणार 'या' 5 राशींचं नशीब! अचानक मिळू शकते गुड न्यूज, आर्थिक स्थितीत होणार सुधारणा

Sandalwood Tree: स्वतः झिजून जगाला सुगंध देणारा चंदनवृक्ष! 40 ते 50 वर्षांच्या वाढीमागचं निसर्गाचं अद्भुत रहस्य

EPFO कडून पेन्शनधारकांसाठी मोठी खूशखबर! आता घरी बसून जमा करता येणार 'डिजिटल लाईफ सर्टिफिकेट'; जाणून घ्या पद्धत

Abhishek Sharma T20 Record: सिक्सर किंग अभिषेक शर्माची कमाल! पॉवरप्लेमध्ये 100 षटकार मारणारा ठरला जगातील पहिला फलंदाज; रोहित शर्माला सोडले मागे

SCROLL FOR NEXT