Babush Monserratte Dainik Gomantak
गोवा

'भाजप मोठा पक्ष; सर्वांचं पक्षात स्वागत'

बाबूश मोन्सेरात यांच्याकडून काँग्रेस आमदारांना खुलं निमंत्रण

आदित्य जोशी

पणजी : गोव्यात सुरु असलेल्या काँग्रेसमधील नाराजीनाट्यावर आता काँग्रेसमधून भाजपवासी झालेले पणजीचे आमदार आणि महसूलमंत्री बाबूश मोन्सेरात यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. भाजप हा मोठा पक्ष असून ज्यांना पक्षात यायचं असेल त्यांचं स्वागत आहे, असं वक्तव्य मोन्सेरात यांनी केलं आहे. एकाप्रकारे अप्रत्यक्षपणे बाबूश यांनी काँग्रेस आमदारांना पक्षात येण्याचा आमंत्रण दिल्याचं आता दिसू लागलं आहे.

गेल्या काही दिवसांपासून गोव्यात तुफान पाऊस सुरु आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी पडझड होऊन जनजीवन विस्कळीत झालं होतं. आता नुकसानग्रस्त गोवेकरांच्या मदतीसाठी महसूलमंत्री बाबूश मोन्सेरात यांनी हात पुढे केला आहे. गोव्यात अनेक ठिकाणी, घरांवर झाडे पडून तसेच, घराच्या भिंती कोसळण्याच्या घटना घडल्या, ज्यात गोवेकरांचं मोठं नुकसान झालं आहे. या सर्व नुकसानग्रस्तांना उपाय म्हणून महसूलमंत्री बाबूश मोन्सेरात यांनी मदत करण्याचे आश्वासन दिलं आहे.

दुसरीकडे आपण काँग्रेसच्या तिकीटावर निवडून आलो असून अजूनही काँग्रेससोबतच असल्याचा दावा लोबो यांनी केला आहे. मात्र काँग्रेसकडून बैठकांवर बैठका घेतल्या जात असून आपल्याला पदावरुन दूर केल्याचंही मायकल लोबोंनी स्पष्ट केलं आहे. तसंच सरकारमधील मंत्र्यांकडून आपल्यावर गंभीर स्वरुपाचे आरोप केले जात असून आपल्यावर कारवाईही केली जात आहे. अशा परिस्थितीत आपण विरोधी पक्षनेतेपदी राहणं कठीण असल्याचं पक्षनेतृत्त्वाला कळवल्याचंही लोबोंनी स्पष्ट केलं आहे.

तर मी काँग्रेसमध्येच मी रिटायर्ड हर्ट असलो तरी काँग्रेस सोडण्याचा प्रश्नच येत नाही पाठीमागच्या विधानसभेवेळी मी एकटा आमदार उरलो होतो. त्यामुळे पार्टी सोडण्याचा विषय येत नाही, अशी प्रतिक्रिया ज्येष्ठ काँग्रेस नेते दिगंबर कामत यांनी दिली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics: काँग्रेससोबत 'आरजी'ची जागावाटपासाठी बैठक; 16 जागांचा प्रस्ताव, सासष्टीत जागेसाठी जोर

AI+ New Gadgets: भन्नाट फीचर्स अन् जबरदस्त परफॉर्मन्स! AI+ ने बाजारात आणली 3 नवी शक्तिशाली गॅजेट्स; काय आहेत वैशिष्ट्ये? किंमत किती?

खरी कुजबुज: काँग्रेसची वजाबाकी

Porvorim Accident: पर्वरीत भरधाव दुचाकीची पादचाऱ्याला धडक; उपचारादरम्यान मृत्यू

Boeing 737 MAX विमानांना सॉफ्टवेअरचा 'धोका'; लँडिंगवेळी मार्गदर्शन प्रणाली बंद होण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT