Court Dainik Gomantak
गोवा

Court News : सुनावणीसाठी गैरहजर राहण्यास बाबूशना मुभा; गुदिन्होंनाही दिलासा

कथित बलात्कार : येत्या सुनावणीस पीडितेची साक्ष

दैनिक गोमन्तक डिजिटल

कथित बलात्कारप्रकरणी महसूलमंत्री बाबूश मोन्सेरात यांना खास न्यायालयाकडून तात्पुरता दिलासा मिळाला आहे. या प्रकरणाच्या सुनावणीस कायमचे गैरहजर राहण्यासाठी त्यांनी केलेला अर्ज खास न्यायाधीश इर्शाद आगा यांनी शुक्रवारी सशर्त मंजूर केला.

बाबूश मोन्सेरात याना या सुनावणीस गैरहजर राहण्याची परवानगी देताना न्यायालयाला गरज वाटल्यास त्यांना प्रत्यक्ष किंवा व्हिडीओ कॉन्फरन्सिंग द्वारे सुनावणीस हजर व्हावे लागेल अशी अट घालण्यात आली आहे.

गुदिन्होंनाही दिलासा

4.50 कोटींच्या वीज बिल सवलत घोटाळाप्रकरणी पंचायतमंत्री माविन गुदिन्हो यांनाही त्यांच्या विरोधात सुरू असलेल्या सुनावणीस गैरहजर राहण्याची परवानगी न्या. आगा यांनी दिली. मात्र, गरज भासल्यास त्यांना न्यायालयात हजर राहावे लागेल असे या आदेशात म्हटले आहे.

गुदीन्हो हे काँगेस मंत्रीमंडळात वीज मंत्री असताना त्यांनी काही कारखान्यांना बेकायदेशीररित्या वीज बिलात सवलत देऊन ४.५० कोटींचा घोळ केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Jitesh Kamat Colvale Jai: कोलवाळ मध्यवर्ती कारागृहाची सद्यस्थिती पाहता, 'गुन्हेगारांना आलिशान सुविधा पुरवणारे हॉलिडे होम' - जितेश कामत

Colvale Central Jail Security: कोलवाळ कारागृहात सध्या चाललेय काय? सुरक्षेचा फज्जा, गुन्हेगारी नेटवर्क जोमाने कार्यरत

Pakistan Youth Protest: पाकिस्तानी गृहमंत्र्यांना 'कॉकरोच' आंदोलनाची भीती, शाहबाज सरकारला दिला घरचा आहेर; तरुणांच्या संतापाकडे वेधले लक्ष

Goa Stray Dogs: भटक्या कुत्र्यांच्या समस्येवर हायकोर्टाची दखल; राज्य सरकारसह स्थानिक स्वराज्य संस्थांना नोटीस

Bail Surety Fine: चुकीचा मोबाईल नंबर देत कोर्टाची दिशाभूल, महिला जामीनदाराला पडलं महागात; 10 हजारांचा ठोठावण्यात आला दंड

SCROLL FOR NEXT