babush monserrate Dainik Gomantak
गोवा

Babush Monserrat Rape Case: पीडितेची अर्धवट राहिलेली साक्ष आज होणार

पीडितेची अर्धवट राहिलेली साक्ष मंगळवार, 22 रोजी खास न्यायाधीश इर्शाद आगा यांच्यासमोर नोंदवली जाणार आहे.

Shreya Dewalkar

ज्या पीडितेने महसूलमंत्री बाबूश मोन्सेरात यांच्यावर बलात्काराचा आरोप केला होता, त्या पीडितेची अर्धवट राहिलेली साक्ष मंगळवार, 22 रोजी खास न्यायाधीश इर्शाद आगा यांच्यासमोर नोंदवली जाणार आहे.

वास्तविक ही साक्ष मंगळवारपासून (ता.21) सुरू होणार होती. पण गोव्याबाहेर काम करणारी पीडित सोमवारीच येथे पोहोचल्याने ती न्यायालयात स्वतःला हजर करू शकली नाही. तिची साक्ष बंद कक्षात होणार आहे.

मंत्री बाबूश मोन्सेरात यांचा अर्ज मंजूर

बलात्कारासारख्या गंभीर आरोपात अडकलेले महसूल मंत्री बाबूश मोन्सेरात यांना खास न्यायालयाकडून तात्पुरता दिलासा मिळाला आहे. या प्रकरणाच्या सुनावणीस कायमचे गैरहजर राहण्यासाठी त्यांनी केलेला अर्ज खास न्यायाधीश इर्शाद आगा यांनी सशर्त मंजूर केला.

बाबूश मोन्सेरात यांना या सुनावणीस गैरहजर राहण्याची परवानगी देताना न्यायालयाला गरज वाटल्यास त्यांना प्रत्यक्ष किंवा व्हिडीओ कॉन्फरन्सिंग द्वारे सुनावणीस हजर व्हावे, लागेल अशी अट घालण्यात आली आहे.

बलात्कार प्रकरण

2016 साली मोन्सेरात यांच्या विरोधात हा गुन्हा नोंद झाला होता. एका 16 वर्षीय मुलीला तिच्या आईकडून 50 लाख रुपयांना विकत घेऊन नंतर तिला गुंगीचे औषध पाजून तिच्यावर बलात्कार केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला होता. या प्रकरणात त्या मुलीच्या आईलाही सह आरोपी करण्यात आले आहे.

आता या प्रकरणी 5 जून पुढील सुनावणी होणार असून त्या दिवशी त्या पिडीतेची महत्वाची साक्ष होणार आहे. 5 जूनपासून या प्रकरणी दर आठवड्याला तीन दिवस म्हणजे सोमवार, बुधवार व शुक्रवार असे तीन दिवस हे प्रकरण सुनावणीस येणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mitchell Starc Fight: लाईव्ह सामन्यात 'रनिंग लाईन'वरुन राडा! मिचेल स्टार्क मेहदी हसन मिराजशी भिडला; हाय-व्होल्टेज ड्रामा व्हायरल

Goa Olympic Association: 'गोवा ऑलिंपिक'ला 21 वर्षांनंतर लाभणार नवा सचिव, गुरुदत्त भक्ता यांची दोन दशकांची कारकीर्द; महत्त्वाच्या स्पर्धांचे राज्यात आयोजन

Shukra Pushkaransh Yog 2026: शुक्रदेवांची अफाट कृपादृष्टी! 15 ऑगस्टपासून 'या' राशींच्या नशिबाला मिळणार नवी दिशा; 'शुक्र पुष्करांश' योग करणार मालामाल

Calangute Dance Bar: कळंगुटमधील 'डान्स बार' बंद करा, गट काँग्रेस समितीची मागणी; पोलिसांना निवेदन सादर

Child Disappearance Goa: राज्यात पाच वर्षांत हरवली 256 मुले, 106 सापडली,150 बेपत्ता

SCROLL FOR NEXT