Utpal Parrikar & babush monserrate Dainik Gomantak
गोवा

Babush Monserrat : बाबूशचे पर्रीकरांवर शरसंधान

Babush Monserrat : ‘स्मार्ट सिटी’च्या सल्लागाराने लाखो रुपये खाल्ले ः मोन्सेरात

दैनिक गोमन्तक

Babush Monserrat : उत्पल पर्रीकर आणि महसूलमंत्री बाबूश मोन्सेरात यांचे वाक् युद्ध रंगणार असे दिसतानाच रात्री मोन्सेरात यांनी अप्रत्यक्षपणे स्व. मनोहर पर्रीकर यांच्यावर शरसंधान साधले. पणजीच्या आमदाराने २५ वर्षे शहराची वाट लावली ते आज आम्हाला भोगावे लागत आहे, असे बाबूश म्हणाले.

स्मार्ट सिटीचा व्यवस्थापकीय संचालक चौधरी तो पात्रही नव्हता, त्याला कोणी नेमले ते तपासा. आयनॉक्स प्रकल्पाचा सल्लागार म्हणून काम केलेल्यास स्मार्ट सिटीचा सल्लागार म्हणून कोणी नेमले ते पहा. त्याची जवळीक कोणाशी आहे हे सर्वांना ठाऊक आहे, असे सांगत सध्याच्या पणजीच्या परिस्थितीला स्व. पर्रीकर हेच जबाबदार आहेत, असे अप्रत्यक्षपणे बाबूश यांनी सांगितले.

दरम्यान, उत्पल यांनी याला उत्तर देताना आपण स्मार्ट सिटीप्रकरणी दिलेले औषध योग्यजागी लागले असून त्यामुळेच ही जळजळ सुरू झाल्याचा टोला हाणला आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आज बाबूश मोन्सेरात, स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजीत रॉंड्रिग्स, पणजी महापालिकेचे अधिकारी, राज्याचे मुख्य सचिव पुनीतकुमार गोयल यांची बैठक घेतली.

जनतेच्या वतीने प्रश्न उपस्थित केलेल्या उत्पल यांना या बैठकीचे निमंत्रण नव्हते. या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना मोन्सेरात यांनी या साऱ्याचे खापर स्व. पर्रीकर यांच्यावर फोडले. ते म्हणाले, त्यांनी त्यावेळी केलेली कर्मे आज आम्ही भोगत आहोत. त्यांनी नेमलेला सल्लागार प्रत्यक्षात कामाच्या ठिकाणी कधीच आला नाही.

त्याने कोट्यवधी रुपये खाल्ले. त्यामुळे आता या प्रकल्पांना आई-बाप नसल्यासारखी स्थिती निर्माण झाली आहे. मुख्यमंत्र्यांनी आता परिस्थिती नियंत्रणाखाली आणली आहे. ३१ मे पर्यंत स्मार्ट सिटीची सर्व कामे पूर्ण होतील.

या प्रकरणी तत्कालीन अधिकारी चौधरी यांची चौकशी व्हावी, अशी मागणी करणार का असे विचारल्यावर ते म्हणाले, चौकशी मागण्याचे सोडा, सध्या लोकांना त्रास होत आहे. आता काम वेगाने होणे आवश्यक आहे. त्यासाठी काही रस्त्यांवरील रहदारी बंद ठेवावी लागेल. वाहतुकीमुळे कामे करता येत नाहीत, हे कंत्राटदाराने दाखवून दिले आहे.

पणजीच्या आमदाराने २५ वर्षे शहराला खडड्‍यात टाकले. त्याची फळे आज आम्ही भोगत आहोत. आम्ही शहरातील पायाभूत सुविधांचा विकास करत आहोत. पणजीचा २५ वर्षे आमदार कोण होता आणि त्याने पणजीचा काय विकास केला, ते शोधा. कोणता प्रकल्प त्यांनी केला ते दाखवावे. हा मी केला, तो मी केला असे त्यांना सांगता तरी येईल का? कॅसिनो आणून पणजी खड्ड्यात घातली, असाही ठपका त्यांनी ठेवला.

मोन्सेरात म्हणाले की, मी वैयक्तिकरीत्या दैनंदिन तत्त्वावर कामावर देखरेख करणार आहे. ३१ मे पर्यंत सर्व कामे पूर्ण होतील, असे पाहीन. बसून बोलणे सोपे आहे, म्हणूनच २०२७ मध्ये सामना करू, असे मी म्हटले आहे. मला माहीत आहे की, माझा त्याच्याशीच सामना होईल.

२०२७ मध्ये पाच वर्षांतील कामाचे प्रगतीपुस्तक मी जनतेसमोर सादर करेन. तेव्हा जनताच काय तो निर्णय घेईल. अद्याप निवडणूक लांब असताना घाई कशाला? राजकारणात वारसा असे काही नसते. २००२ पासून मी निवडणुका लढवत आहे. माझे माता-पिता राजकारणात नव्हते. लोक मला मते देतात, कारण मी कामाप्रती प्रामाणिक असतो, याची त्यांना माहिती असते. २००२ मध्ये ताळगावला रस्ता व पदपथ बांधला.

जो आताही जराही खचलेला नाही. काम गुणवत्तेने झाले कारण मी कोणाकडून कमिशन घेतलेले नाही. सल्लागार सेवा ही कमिशन एजन्सी असते. ही सल्लागार सेवा गोव्यात कोणी आणली ते तपासा. कोणत्या काळात किती सल्लागार नेमले आणि त्यांना किती शुल्क दिले ते तपासा. अशा शुल्कातून दोन पूल बांधता आले असते.

त्या काळात जुन्ता हाऊस सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अभियंत्यांच्याच देखरेखीखाली बांधले. आता पदपथ बांधण्यासाठीही सल्लागार का हवा? पीडब्ल्यूडीकडे ३०-३० वर्षे अनुभव असलेले अभियंते आहेत. त्यामुळे सल्लागार नेमण्याचा कालखंड तपासा.

पर्रीकरांना मी प्रथम, नंतर पक्ष

पणजीतून भाजपचा आमदार माझ्या रूपाने प्रथमच जिंकला आहे, असे सांगून त्यांनी आपणच पर्रीकर यांना निवडून आणत होतो, असे अप्रत्यक्षपणे सुचवले. ते म्हणाले, पर्रीकरांसाठी मी प्रथम आणि नंतर पक्ष असायचा. मला राजकारणाचा २२ वर्षांचा अनुभव आहे. त्यामुळे २०२७ मध्ये सामना करू, असे मी म्हटले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

India Bike Week 2024: चित्तथरारक स्टंट, म्युझिक आणि बरंच काही...; गोव्यातील बाईक इव्हेंटच्या Date, Venue जाणून घ्या

Tribute to the Legends मिरामार किनारी सुदर्शन पटनाईक यांनी साकारले सिने जगतातील दिग्गजांचे Sand Art, पाहा फोटो

SCROLL FOR NEXT