पणजी: पणजी व ताळगाव मतदारसंघात मोठ्या मतांच्या फरकाने निवडून न येण्यामागील खापर बाबुश मोन्सेरात यांनी भाजप केडर कार्यकर्ते व पक्षावर फोडले. या केडरने मला स्वीकारले नसल्यानेच विरोधी उमेदवाराकडून कमी मताने मला विजय मिळाला. तसेच ताळगावमधील मतांचा फरक कमी झाला, असे मत व्यक्त करून या मतांच्या फरकाबाबत आमदार बाबुश मोन्सेरात यांनी असमाधान व्यक्त केले. (Babush Monserrate News)
भाजप कार्यकर्त्यांची उत्पलला मदत : पणजीतून भाजपच्या तिकिटावर विजयी झालेले बाबुश मोन्सेरात यांनी भाजपच्या कार्यकर्त्यांनी ज्या प्रकारे काम केले त्याबाबत नाराजी व्यक्त करत म्हणाले, भाजपच्या बहुतेक कार्यकर्त्यांनी माझ्या विरोधात व विरोधकाला मते मिळवून देण्यात काम केले. त्यामुळे आता या कार्यकर्त्यांना पक्षाने शिस्त आणण्याची गरज व्यक्त केली. भाजपच्या कार्यकर्त्यांनी माझ्याऐवजी विरोधी उमेदवार उत्पल पर्रीकर यांनाच सहानुभूती दाखवली. त्यामुळे ते इतकी मते घेण्यास यशस्वी ठरले. मात्र, मी केलेल्या प्रयत्नामुळे तसेच काही भाजप कार्यकर्ते माझ्यामागे खंबीरपणे उभे राहिल्याने हा विजय मिळवू शकलो अशी प्रतिक्रिया बाबूश यांनी दिली.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.