Santa Cruz Constituency Dainik Gomantak
गोवा

Santa Cruz Constituency: सांताक्रूझमध्ये भाजपच्या उमेदवारास पाठिंबा, बाबूश मोन्सेरात यांचे स्पष्टीकरण; रुडॉल्फबाबत बोलणं टाळलं

Santa Cruz Constituency BJP: निवडणूक लढविण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे. कोणालाही निवडणूक लढविण्यापासून आपण रोखू शकत नाही

गोमंतक ऑनलाईन टीम

पणजी: निवडणूक लढविण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे. कोणालाही निवडणूक लढविण्यापासून आपण रोखू शकत नाही. मात्र, सांताक्रूझ मतदारसंघात भाजपचाच उमेदवार विजयी होईल. भाजप ज्याला उमेदवारी देईल, त्या उमेदवाराला आपण पाठिंबा देऊ, असे मंत्री बाबूश मोन्सेरात यांनी आज स्पष्ट केले.

सांताक्रूझ मतदारसंघात मोन्सेरात यांनी स्वतःचे कार्यालय सुरू केल्याने या विषयाला राजकीय रंग आला आहे. त्यांच्या या निर्णयावर स्थानिक आमदार रुडॉल्फ फर्नांडिस यांनी जोरदार टीका केली होती. तसेच हा विषय मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या निदर्शनासही आणून दिला होता.

यापूर्वी मोन्सेरात यांनी हे पक्षाचे कार्यालय असल्याचे जाहीर केले होते. मात्र, त्यावरून चर्चा सुरू झाल्यानंतर आणि रुडॉल्फ फर्नांडिस यांनी नाराजी व्यक्त केल्यानंतर त्यांनी हे आपले कार्यालय असल्याचे स्पष्ट केले.

सांताक्रूझमधील भाजपच्या उमेदवारीबाबत मोन्सेरात म्हणाले की, आपण भाजपचाच एक भाग आहोत. पक्षाने ज्याची उमेदवार म्हणून निवड केली असेल, त्याच्या पाठीशी आपण ठामपणे उभे राहू. रुडॉल्फ फर्नांडिस यांच्या उमेदवारीबाबत मात्र त्यांनी बोलण्यासनकार दिला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! रक्षाबंधनाच्या मुहूर्तावर महागाई भत्ता वाढीची घोषणा होणार? समोर आली मोठी अपडेट

Fraud Case: 10 कोटी रुपयांचे कर्जाचे आमिष महागात पडले! सराफी दुकानदाराला 26 लाखांना गंडा! महाराष्ट्रातील 5 जणांविरोधात तक्रार

Kareena Kapoor Pregnant: करीना कपूर प्रेग्नेंट? Viral Videoमुळे चर्चांना उधाण! अखेर अभिनेत्रीच्या टीमनं दिलं स्पष्ट उत्तर, सांगितलं नेमकं सत्य

Goa Politics: पक्षांतराची हॅट्‌ट्रिक पुन्हा शक्य, सरदेसाईंची काँग्रेसवर टीका; युतीचा विशेष फायदा नाही!

खरी कुजबुज: भाजपच्या आदेशाचे पालन

SCROLL FOR NEXT