former Deputy Chief Minister Babu Ajgaonkar Dainik Gomantak
गोवा

Goa Politics: 'निवृत्ती ही अफवा, पेडणेतूनच लढणारच'! माजी उपमुख्यमंत्री आजगावकरांचा निर्धार; 2027 विधानसभेसाठी ठोकला शड्डू

Babu Ajgaonkar: २०२७ मध्ये पेडणे विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहे. माझा तसा निर्धार आहे, असे माजी आमदार व माजी उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर यांनी स्पष्ट केले आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

सासष्टी: मी राजकारणातून निवृत्ती पत्करली आहे, असा व्हिडिओ कुणीतरी समाज माध्यमांवर व्हायरल करत आहे. ही केवळ अफवा आहे. ज्या विरोधकांना माझ्यापासून भीती वाटते, तेच हे काम करत आहेत.

खरे तर, मी २०२७ मध्ये पेडणे विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहे. माझा तसा निर्धार आहे, असे माजी आमदार व माजी उपमुख्यमंत्री मनोहर ऊर्फ बाबू आजगावकर यांनी स्पष्ट केले आहे.

पेडण्‍यात जो विकास झाला आहे, तो माझ्‍यामुळेच. माजी आमदार व केरळचे विद्यमान राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांची जी कामे अर्धवट होती, ती सर्व मी पूर्ण केली. स्टेडियम, स्मशानभूमी, रस्त्यांचे हॉटमिक्स डांबरीकरण मीच केले. म्‍हणूनच चारवेळा निवडून आलो, असे आजगावकर यांनी सांगितले.

मगो, काँग्रेस व भाजप या पक्षांच्या चार सरकारांमध्ये मी काम केले. पक्षांतर केले पण लोकांच्या हितासाठी केले. काही लोक पक्षांतर करतात, पण काम करत नाहीत. पेडणेतील नगरपालिका निवडणुकीत मी हस्तक्षेप करणार नाही. केवळ चांगले लोक निवडून यावेत, असेच मला वाटते, असेही आजगावकर म्‍हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Post: "आता तरी गंभीर व्हा!" विजयाचा पत्ता नाही अन् पराभवांचे रेकॉर्ड्स; नेटकऱ्यांनी गौतम गंभीरला धरलं धारेवर

Goa Crime: मांद्रेत धक्कादायक प्रकार, 6 जणांच्या टोळक्याकडून वृद्ध पती-पत्नीसह मुलाला मारहाण; प्रॉपर्टीच्या वादातून राडा!

Benaulim Beach: एव्हरी डे इज ए गुड डे! फिशरमन पेलेचा बम्पर कॅच; विद्यार्थ्यांनीही घेतले मासेमारीचे धडे Watch Video

VIDEO: स्पेनमध्ये भीषण अपघात! दोन हाय-स्पीड ट्रेनची समोरासमोर धडक; 21 प्रवाशांचा मृत्यू, 70 हून अधिक जखमी

Bulbul Film Festival: 50 हजारांपेक्षा जास्त मुले, 73 चित्रपट; बुलबुल बालचित्रपट महोत्सवाची यशस्वी सांगता

SCROLL FOR NEXT