Margao Municipality  Dainik Gomantak
गोवा

Margao News: मडगाव उपनगराध्यक्षपदी बबिता नाईक यांची बिनविरोध निवड

Margao News: मडगावच्या उपनगराध्यक्षपदी प्रभाग 25 मधील नगरसेविका बबिता सदानंद नाईक यांची बिनविरोध निवड झाली.

दैनिक गोमन्तक

Margao News: मडगावच्या उपनगराध्यक्षपदी प्रभाग 25 मधील नगरसेविका बबिता सदानंद नाईक यांची बिनविरोध निवड झाली. या पदासाठी केवळ बबिता नाईक यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड झाल्याची घोषणा नगरपालिका प्रशासन संचालनालयाने निर्वाचन अधिकारी म्हणून नियुक्त केलेले उपजिल्हाधिकारी रमेश गावकर यांनी केली.

बबिता नाईक यांनी तीन अर्ज सादर केले होते. त्यातील पहिल्या अर्जावर नगराध्यक्ष दामोदर शिरोडकर, दुसऱ्या अर्जावर माजी उपनगराध्यक्षा दीपाली सावळ आणि तिसऱ्या अर्जावर कामिल बार्रेटो यांनी अनुमोदक म्हणून सह्या केल्या. बैठकीच्या सुरवातीला सत्ताधारी भाजप गटातील केवळ ११ नगरसेवक उपस्थित होते.

नवनिर्वाचित उपनगराध्यक्षा बबिता नाईक यांचे नगरसेवक पती सदानंद नाईक यांना आजारामुळे रुग्णालयात दाखल केल्याने ते गैरहजर होते. मात्र, आता त्यांची तब्येत सुधारल्याची माहिती उपनगराध्यक्षा नाईक यांनी दिली. या बैठकीवर विरोधी गट गोवा फॉरवर्ड आणि एका अपक्ष नगरसेवकाने बहिष्कार टाकला.

उपनगराध्यक्षपदी निवड झाल्यावर नगराध्यक्ष दामोदर शिरोडकर, मुख्याधिकारी गौरीश शंखवाळकर तसेच इतर नगरसेवकांनी बबिता नाईक यांचे अभिनंदन केले. पत्रकारांशी बोलताना बबिता नाईक यांनी, आपल्याला ही संधी दिल्याबद्दल मडगावचे आमदार दिगंबर कामत, नगराध्यक्ष दामोदर शिरोडकर आणि पाठिंबा दिलेल्या सर्व नगरसेवकांचे आभार मानले

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Apostille Process: परदेशात जाणाऱ्या गोवेकरांसाठी खूशखबर! कागदपत्रांच्या पडताळणीची प्रक्रिया झाली सुलभ; सरकारकडून 'SOP' जाहीर

Babush Monserrate Santa Cruz Office: "परवानगी मागितली असती तर नकारच दिला असता!", बाबूश मोन्सेरात यांच्या कार्यालयावरुन भाजप प्रदेशाध्यक्षांनी स्पष्टच सांगितलं

Konkan to Akkalkot ST Bus: कोकणवासीयांसाठी स्वामींचं दर्शन झालं सोपं! सिंधुदुर्गातून अक्कलकोटसाठी रोज धावणार 'लालपरी'; मार्ग, वेळ जाणून घ्या

VIDEO: वंदे भारतमध्ये धक्कादायक प्रकार! रेल्वे अधिकाऱ्याच्या पत्नीने ड्रायव्हर केबिनमध्ये बनवली रील; व्हिडिओ Viral होताच कारवाईचे आदेश

Jharkhand Mob Lynching: अल्पवयीन मुलीवरील अत्याचाराच्या आरोपातून 150 जणांच्या जमावाकडून तरुणाची हत्या; आई-वडिलांना बांधून मुलावर काठ्या-दगडांनी हल्ला

SCROLL FOR NEXT