Goa Cabinet Reshuffle Dainik Gomantak
गोवा

Goa Cabinet Reshuffle: लॉटरी कुणाला? सिक्वेरांना वगळून काब्रालांना संधी? महिनाअखेरीस होणार मंत्रिमंडळात फेरबदल

Goa Cabinet Expansion: भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षांची निवड काही संघटनात्मक कामे असल्याने पुढे ढकलली जाण्याची शक्यता व्‍यक्त करण्यात येत होती.

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Cabinet Change B L Santosh Visit

पणजी : भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस (संघटन) बी. एल. संतोष यांच्या गोवा दौऱ्यानंतर आता या महिन्याच्या अखेरीस राज्य मंत्रिमंडळात मोठे फेरबदल होणार आहेत. पर्यावरणमंत्री आलेक्स सिक्वेरा यांना वगळून कुडचड्याचे आमदार नीलेश काब्राल यांना मंत्रिपदी काम करण्याची संधी देण्याचे जवळजवळ निश्चित झाले आहे.

यासंदर्भात बी. एल. संतोष यांच्याकडे प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनीही एक अहवाल दिला आहे. मंत्र्यांची वर्तणूक, त्यांच्यावर असलेले खटले, या साऱ्यांची माहिती संतोष यांनी संकलीत केली आहे. त्यांनी गोवा दौऱ्यावर आधारित अहवाल अद्याप पक्षश्रेष्ठींना सादर केलेला नाही. येत्या

एक-दोन दिवसांत गोव्याविषयी चर्चा होतेवेळी ते गोव्यातील फेरबदलाबाबतचे आपले आकलन सादर करतील, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.

भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षांची निवड काही संघटनात्मक कामे असल्याने पुढे ढकलली जाण्याची शक्यता व्‍यक्त करण्यात येत होती. त्यामुळे गोव्यातील मंत्रिमंडळ फेरबदल आणि संघटनात्मक नियुक्त्या लांबणीवर पडणार नाहीत, असे सूत्रांनी स्पष्ट केले.

राज्य विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर मंत्रिमंडळ फेरबदलाविषयी पक्षश्रेष्ठींकडून मुख्यमंत्र्यांना निरोप देण्यात येईल. त्यानंतर मंत्रिमंडळ फेरबदलाचा विषय मार्गी लागणार आहे.

प्रदेशाध्यक्षांचा बिनचूक अहवाल परिणामकारक

१.मंत्रिमंडळातील फेरबदलाचा विषय गेले वर्षभर या ना त्या कारणाने पुढे ढकलला गेला असला तरी आता तो ऐरणीवर आला आहे.

२.भाजप प्रदेशाध्यक्षपदी दामू नाईक यांची निवड झाल्यानंतर आता पक्ष संघटनेत बदल केले जाणार आहेत.

३.मंत्रिमंडळ फेरबदलासाठी काही नेत्यांनी दिल्लीत प्रयत्न सुरू केले होते.

४.त्यांनाही दामू नाईक यांची भेट घ्यावी, असा सल्ला देण्यात आला आहे.

५.दामू यांनी सडेतोडपणे दिलेला अहवाल संतोष यांना आवडला आहे.

६.दामू यांनी प्रत्येक नेत्याविषयी बिनचूक माहिती दिल्याने फेरबदलात त्या अहवालाचा मोठा वाटा असेल, असे सांगण्यात येते.

लॉटरी

मंत्रिमंडळ फेरबदल केवळ दोन मंत्र्यांपुरताच मर्यादित राहणार नाही, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. काही मंत्री काही खटल्यांत आहेत. काहींच्या खटल्यांचा निकाल नजीकच्या काळात लागण्याची शक्यता आहे. हे सारे गृहित धरून मंत्रिमंडळ फेरबदलाचा विषय मार्गी लावण्यात येणार आहे. त्यामुळे कॉंग्रेसमधून भाजपमध्ये आलेल्या ८ आमदारांपैकी आणखीन कोणा-कोणाला मंत्रिमंडळात संधी मिळणार, याविषयीची उत्सुकता वाढली आहे.

कामतांचे लॉबिंग

मडगावचे आमदार दिगंबर कामत यांचेही मंत्रिमंडळातील स्थान पक्के झाले आहे. काब्राल आणि कामत यांनी संतोष यांची गोवा दौऱ्यादरम्यान भेट घेतली होती. संतोष यांनी या दोघांशी सविस्तर चर्चा केली आहे. कामत यांनी संतोष यांच्या दौऱ्यानंतर थेट दिल्ली गाठली आहे. ते आपल्या मंत्रिमंडळ समावेशासाठी भाजप पक्षश्रेष्ठींकडून ठोस आश्वासन मिळविण्याच्या प्रयत्नात दिल्लीत ठाण मांडून आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT