World Diabetes Day : सासष्टी, जागतिक मधुमेह दिन मंगळवार, १४ रोजी साजरा केला जाणार आहे. त्यानिमित्त नवे मार्ग फाउंडेशन, इंडियन मेडिकल असोसिएशन-गोवा, लायन्स क्लब इंटरनॅशनल डिस्ट्रीक्ट ३१ ७बी व रिसर्च सोसायटी डायबिटीस इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने ताळगाव येथील कम्युनिटी सेंटरमध्ये खास जागृती बैठकीचे आयोजन केले आहे.
ही तिसरी लिव्हिंग हॅपिली विथ डायबिटीस बैठक असून त्याद्वारे मधुमेहाबद्दलची माहिती, त्यावरचे उपाय, योग वगैरेची माहिती दिली जाणार आहे.
ही माहिती सोमवारी (ता.१३) मडगावात घेतलेल्या पत्रकार परिषदेत ‘नवे मार्ग’चे डॉ. सेल्सो फर्नांडिस, रिसर्च इंडिया डायबिटीसचे डॉ. लेनी दा कॉस्ता, आयएमएच्या डॉ. बबिता आंगले प्रभुदेसाई व लायन्स क्लब डिस्ट्रीक्ट गव्हर्नर अर्ल पिंटो यांनी दिली.
गोव्यात लिव्हिंग हॅपिली विथ डायबिटीस क्लबच्या गोव्यात २२ शाखा व ७०० सदस्य आहेत. हे सर्व सदस्य या बैठकीला अपेक्षित असले तरी अजूनपर्यंत ४५० पेक्षा जास्त जणांनी आपला सहभाग निश्र्चित केल्याचे डॉ. सेल्सो फर्नांडिस यांनी सांगितले. आयएमए, लायन्स क्लब, रिसर्च सोसायटी ऑफ इंडिया डायबिटीस या सर्वांनी या बैठकीला व गोव्यातील मधुमेह जागृती मोहिमेला आपला पाठिंबा असल्याचे व सहकार्य करण्याचे आश्र्वासन यावेळी दिले.
गोवा हे देशातील मधुमेहाचे मुख्य केंद्र असल्याचे सांगितले जाते. गोव्यातील २५ टक्क्यांपेक्षा जास्त लोकसंख्या मधुमेहाने ग्रासली आहे. मधुमेह रुग्णांची संख्या कमी करण्यासाठीच ही बैठक आहे.
- डॉ. सेल्सो फर्नांडिस, ‘नवे मार्ग’ संस्था
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.